✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.11जानेवारी):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा लोककलावंत सांस्कृतिक सेल अनेक वर्षा पासून सर्व समाज घटकातील कलावंतांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे.समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती नष्ट करण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना प्रदेश काँग्रेस तर्फे नेहमीच प्रोत्साहन दिले जाते.
योग्य कलागुण अवगत असून सुद्धा प्रसिद्धी पासून वंचित असलेल्या कालावंतांना सेल तर्फे विचार मंच उपलब्ध करून दिला जातो,लोककलावंत सांस्कृतिक सेलचे सर्व कार्यक्रम कोरोना महामारी मूळे दोन वर्षे थांबले होते,सेलने पुन्हां नव्या उमेदीने कार्यारंभ करण्याचे ठरून शनिवार दिनांक-७ जानेवारी २०२३ रोजी रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर मुंबई येथे भव्य असा लोककला मोहोत्सव आयोजित केला होता.या कार्यक्रममध्ये विविध कालावंतां कडून विविध लोककलांचे सादरीकरण करणेत आले.
सांस्कृतिक क्षेत्रात शाहीर महावीर शिंदे यांनी आजवर कलावंत म्हणून दिलेले योगदान अतुलनीय असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले साहेब यांचे आदेशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लोककलावंत सांस्कृतिक सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष पदी शाहीर महावीर शिंदे यांची निवड करनेत आली. व कलेद्वारे समतावादी विचारांचा प्रचार-प्रसार करून विविध कलागुण अवगत असलेल्या सर्व समाज घटकातील लोककलावंतांचे प्रश्न सोडविणे साठी शुभेच्छा दिल्या.या वेळी मा.माणिकराव ठाकरे,मा.चंद्रकांत हंडोरे व ख्यातनाम गीतकार व गायक मा.विष्णू शिंदे उपस्थित होते.