Home महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिवराज अमित येवले पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथम

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिवराज अमित येवले पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथम

235

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर (दि-१०जानेवारी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात पिंपरी चिंचवड शहरातील मनपा आणि खाजगी शाळांचा निकाल आज लागला या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये महापालिका क्षेत्रातील पाचवीचे 7095 तर आठवीचे 4264 विद्यार्थी बसले होते शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला आहे त्यामध्ये के एस सी प्रेरणा शाळेचा विद्यार्थी शिवराज अमित येवले हा 92.61 टक्के गुण मिळवून शहरात प्रथम आला आहे.

या याच्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सलग पाच वर्षे गुणवत्ता यादीत येण्याची परंपरा याही वर्षी शाळेने कायम राखली आहे सदर परीक्षेसाठी मुख्याध्यापिका सीमा महाजन, शिक्षक श्री विलास शिंदे, श्रीमती सुनिता जाधव, सौ स्वाती ताम्हणकर, सौ मंजिरी ब्रम्हे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे कार्याध्यक्ष श्री वालचंद संचेती यांनी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक केले तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here