Home महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर

राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर

239

शेगांवच्या संत गजानन महाराज आणि शिर्डीच्या संत साईबाबाच्या पायी पदयात्रा करणारे हजारो मराठा,ओबीसी बहुजन समाजाचे तरुण आम्ही रोडने अनवाणी पायी चालतांना पहिले. त्यांना स्वताच्या शरीराची काळजी वाटत नसते.परत आल्यावर शरीराच्या वेदना त्यांना निसर्गाच्या नियामची आठवण करून देतो.नंतर डॉक्टर व त्यांनी दिलेल्या औषधाचा तीन वेळ खाऊन शरीराची वेदना कमी करावी लागते.तेव्हा श्रद्धा सबुरी आणि उपासना कमी येत नाही.पण मनाची शांती होते आणि गर्वाने सांगितल्या जाते दिंडीत पदयात्रेत जाऊन आलो.असो ही त्यांची मानसिकता तशी बनविलेली असते.त्यामुळेच तो विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात असून ही त्यांच्या मनाला जगाशी जोडण्यास तयार नसतो.

मराठा,ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणांना बारा जानेवारी किती माहिती आहे.हा माझा दरवर्षी प्रश्न असतो.कारण मराठा ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणापिढीवर मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे गुरुजीचा प्रभाव जास्त दिसतो.तो त्यांना वेगवेगळा पद्धतीने राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खोटा इतिहास सांगून नियमितपणे समाजात दंगली घडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मराठा,ओबीसी बहुजन समाजाचे तरुणांना मराठा बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगती करिता सर्वार्थाने पूर्णवेळ प्रयत्नशील असणारा 72 वर्षांचा योद्धा-युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब दिसत नाही. त्यांनी लिहलेले पुस्तके ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांच्या जीवनाचे सोने झाले.ते परिवर्तन चळवळीचे चक्र झाले.

मी शिवसेना मनसे व भाजपा मध्ये काम करणाऱ्या तरुण मराठा ओबीसी कार्यकर्त्यांना विचारतो.जिजाऊ प्रकाशनाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहलेले पुस्तके कधी वाचले काय?अनेकांचे उतर नकारत्मक असते.तेव्हा त्यांना सांगावे लागते विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अंत्री खेडेकर या गावी ०४ जानेवारी,१९५० या दिवशी एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात पुरुषोत्तम खेडेकर यांचा जन्म झाला होता.लहानपणापासूनच ते हुशार आणि चौकस बुद्धीचे होते.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी सिव्हील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते.पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम केले.नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरल्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर यांना एकसंधपणे राहणाऱ्या मराठा बहुजन समाजामध्ये सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय-शैक्षणिक आदी बाबतींत भिन्नता असल्याची जाणीव झाली.याच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीकरता प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा वेगळा प्रवाह तयार करावा लागेल या जाणिवेतून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ०१ सप्टेंबर,१९९० रोजी अकोला येथे आपल्या शासकीय-प्रशासकीय सेवेतील जवळपास २०० कर्मचारी-अधिकारी सहकाऱ्यांसमवेत मराठा सेवा संघाची स्थापना केली.

माँसाहेब जिजाऊंना सर्वोच्च स्थानी ठेवून स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या अंतर्गत संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांसह विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या 33 कक्षांची निर्मिती पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केली.जिजाऊंचे जन्मगाव असलेले सिंदखेडराजा या क्षेत्राचा विकास करून तिथे जिजाऊ सृष्टी सारखा जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा करण्याचे काम पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हाती घेतले आहे.आज ते काम पूर्णत्वास जात आहे.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या माध्यमातून उभा राहत असणारा सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प येणाऱ्या काळात नक्कीच जागतिक पातळीवरचे पर्यटनाचे केंद्र झाल्या शिवाय राहणार नाही. १२ जानेवारी चा सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मोत्सव,त्यावेळी लाखो अनुयायांची तिथे गर्दी जमणे,एका दिवसात कोट्यावधी रुपयांच्या पुस्तकांची खरेदी-विक्री होणे,मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या एका नावाखाली समस्त मराठा-बहुजन समाज एकसंध राहणे,मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जातीय-धार्मिक द्वेष कमी होऊन दंगलीही कमी होणे या सर्वसामान्यांच्या कल्पनेतील गोष्टी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी प्रत्यक्षात करून दाखवल्या आहेत आणि समाजामध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या अथक परिश्रमामुळे मराठा सेवा संघ केवळ एक संघटना न राहता एक व्यापक चळवळ तयार झाली आहे.भविष्याचा वेध घेत हरक्षणी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करत तो विचार पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णवेळ अथक परिश्रम घेण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीमुळे त्यांची समाजात आज युगनायक-युगपुरुष म्हणून वेगळी ओळख तयार झाली आहे.म्हणूनच राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब असे मी लिहित आहे.

सरकारी नोकरी करत असतांना आणि सेवानिवृत्तीनंतर कोणताही अधिकारी समाजात सहसा मिसळतांना दिसत नाही.प्रशासकीय कामाचा अनुभव समाजातील तरुणांना मार्गदर्शन विना मोबदला घेता करतांना दिसत नाही.पण पुरुषोत्तम खेडेकर साहेब महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता असतांना मराठा सेवा संघाची वैचारिक पातळीवर मांडणी करून स्थापना केली.त्याच बरोबर ३३ वेगवेगळे कक्ष निर्माण केले.त्याचा वैचारिक मांडणी करून सतत छोटे जनजागृती प्रबोधन करणारी पुस्तके लिहणे,वृत्तपत्रात साप्ताहिक,मासिकात नियमितपणे लिखाण करून प्रचार,प्रसार करण्यासाठी आज ही वयाच्या ७२ झाली पायाला भिंगरी बांधून ही व्यक्ती फिरते.मला २३ जुलै,२०२२ रोजी खेडेकर साहेबांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या वेळी घेतलेले छायाचित्र मला सोशल मिडीयावर मिळाले होते.ते मी जपून ठेवले होते.साहेबांच्या उजव्या पायाच्या एका हाडाचे ऑपरेशन झालेले आहे.पायाची जखम ताजी आहे.पायाला पट्टी आहे.

तरीही ऑपरेशन नंतर फक्त आठवडाभराच्या विश्रांतीनंतर लगेचच साहेबांनी पूर्वनियोजित दौऱ्याला सुरुवात केली.कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेला हा दौरा नाही.तर सामाजिक बांधिलकी म्हणून अविरतपणे काम करण्याची त्यांची जिद्द आणि कष्ट त्यागाची सवय त्यांना स्वस्त बसू देत नव्हती.त्यामुळेच त्यांनी समाजाच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, सांस्कृतिक समस्या जाणून घेण्यासाठी पूर्वनियोजित दौरा रद्द न करता पुढे चालू ठेवले.ते केवळ जागतिक पातळीवरचे वैचारिक दिशा दाखवणारे पर्यटनाचे केंद्र निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.त्यासाठी मराठा,ओबीसी बहुजन समाजाच्या तरुणांनी बारा जानेवारीला मातृतीर्थ शिंदखेड राजा येथे वारी करावी.राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टी निर्माण करणारे युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांचे हात मजबूत करा.राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टीला मानवंदना द्या.इतिहास घडवा.

✒️सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई(मो:-९९२०४०३८५९)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here