Home चंद्रपूर सर्वधर्म सामूदायिक सोहळा समितीची चंद्रपूर कार्यकारणी गठीत

सर्वधर्म सामूदायिक सोहळा समितीची चंद्रपूर कार्यकारणी गठीत

96

🔸अध्यक्ष पदी सौ शोभाताई पोटदुखे तर सचिव पदी निलम राचलवार यांची निवड

🔹सर्व धर्म सामूदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10जानेवारी):-धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुबंई यांचे परिपत्रक नुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील देवस्थान,सेवाभावी,सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या वतीने सामूदायीक विवाह सोहळा दि.४ मार्च२३ ला दु.१२.३०वा चांदा ग्राउंड चंद्रपूर ला आयोजित करण्यात आला आहे.सदर सोहळा यशस्वी करण्याचे दृष्टिकोनातून सहाय्यक धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांचे कार्यालयात सर्व धर्म सामूदायीक विवाह सोहळा चंद्रपूर खालील कार्यकारणी मंडळासह दि २७ डिसेंबर २२ ला अडव्होकेट व विश्वतामधून निवड करण्यात आली.

अध्यक्ष सौ शोभाताई पोटदुखे चंद्रपूर, उपाध्यक्ष कैलास खंडेलवार बल्लारपूर , सचिव निलम राचलवार चिमूर, कोषाध्यक्ष रामदास वागदरकर बल्लारपूर, सदस्य ऍड राजेश्वर ढोक चंद्रपूर, ऍड मनोज काकडे राजुरा, एड रितेश सिंघवी चंद्रपूर,एड आशिष गुप्ता चंद्रपूर,उत्तमराव मोहितकर कोरपना,हरविंदरसिंग धुनाजी चंद्रपूर,योगेश पांडे भद्रावती,हर्षवर्धन सिघवी चंद्रपूर,सुरेश लोहे चंद्रपूर,मसूद अहमद शेख महंमद राजुरा,सुधाकर कडू वरोरा यांची निवड करण्यात आली.

वरील प्रमाणे कार्यकारणी च्या माध्यमातून सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. पी.के. करवंदे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शनात सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक ठाकरे, निरीक्षक मडावी व उपाध्ये यांच्या सहकार्याने भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व जनतेने विवाह सोहळा करिता दि १५ फरवरी २३ पर्यत नोंदणी करण्याचे आवाहन समितीने केले आहे.सदर नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात किंवा तालुक्यातील असलेल्या प्रमुख संस्था किंवा संस्थान मध्ये नोंदणी करता येईल असे आवाहन समितीचे अध्यक्ष व सौ. शोभाताई पोटदुखे व सचिव निलम राचलवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here