Home महाराष्ट्र पत्रकार दिनी विविध संघटनेकडून पत्रकारांचा सत्कार

पत्रकार दिनी विविध संघटनेकडून पत्रकारांचा सत्कार

139

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.8जानेवारी):- ६ जानेवारी हा दिन पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुसद येथील समस्त पत्रकार बांधवांचे विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले.
दीपक आसेगावकर यांनी आपल्या श्रीराम कृषी भूमी वरुड येथील शेतात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त सकाळी ९ ते १० वाजताचे दरम्यान पुसद तालुक्यातील पत्रकारांना सन्मानाने बोलवून भेटवस्तू देऊन सत्कार केला. या सत्कार समारंभाला पुसद शहर व परिसरातील बहुसंख्य पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शविली.

माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेच्या वतीने बस स्टॅन्ड पुसद येथे पत्रकारांना आमंत्रित करून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्तात्रय जाधव शेतीनिष्ठ शेतकरी हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पुसद येथील जेष्ठ विधीतज्ञ ॲड. आशिष देशमुख, पुसद आगार व्यवस्थापक अभिजीत कोरटकर, प्रबोधनकार पंकज पाल महाराज, ज्येष्ठ पत्रकार के.जी. चव्हाण,पुसद पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक हरीमकर,पुसद पञकार संघांचे अध्यक्ष अनिल चेंडकाळे यांचे सह पत्रकार दिनकर गुल्हाने मंचावर उपस्थित होते.माणुसकीची भिंत सामाजिक संघटनेच्या वतीने पुसद शहर व परिसरातील पत्रकार बांधवांचा स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

भिम टायगर सेना यांचे वतीने विश्रामगृह पुसद येथे सर्व पत्रकारांना आमंत्रित करून भीम टायगर सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ शाल देऊन पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी दुग्ध तंत्रनिकेतन महाविद्यालय पुसदचे प्राचार्य प्रशांत वासनिक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर देशमुख, विश्वास भवरे, राजू पठाडे, यांचे सह ज्येष्ठ पत्रकार विचार मंचावर उपस्थित होते.पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुसद मधील सर्व पत्रकार बंधूंचा येतोचित स्वागत करीत असताना भीम टायगर सेनेच्या वतीने प्रास्ताविक करताना प्राध्यापक सुनील खाडे यांनी पत्रकारिता म्हणजे काय ? त्या समोरील आव्हाने आदी बाबी विशद केल्यात.

सूत्रसंचालन प्रा. सुधीर गोटे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा भीम टायगर सेनेचे अध्यक्ष किशोर कांबळे यांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रम यशस्वीतेसाठी भीम टायगर सेनेच्या महिला आघाडी प्रमुख गीता कांबळे, प्रभाकर खंदारे,विष्णू सरकटे, अण्णा दोडके, प्रीतम आळणे,राहुल धुळधुळे, मधुकर ठोके, नारायण दोडके यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here