🔹सहाय्यक निरीक्षक अनिल कुंभरे ब्रम्हपुरी पो. स्टे. यांचेकडून मार्गदर्शन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 7 जानेवारी):-महाराष्ट्र पोलिस दलाचे स्थापना दिनानिमित्त 2 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत पोलिस वर्धापण सप्ताहात पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी जि चंद्रपूर यांचे वतीने शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन प्रत्यक्ष शाळेत जावून करण्यात येत आहे.
याचेच औचित्याने विकास विद्यालय अर्हेरनवरगाव येथे दि 7 जानेवारी 2023 ला ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा श्री अनिल कुंभरे ,बिट जमादार मा अरुण पिसे यांचे उपस्थितीत, मा सतिश गोविंदराव ठेंगरे सचिव साहेब विकास शिक्षण संस्था अर्हेरनवरगाव यांचे अध्यक्षतेखाली व श्री एस डी मेश्राम सर मुख्याध्यापक विकास विद्यालय अर्हेरनवरगाव, सर्व शिक्षकवृंद शिक्षिका यांचे प्रमुख उपस्थितीत समुपदेशन व जाणिव जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
ह्या कार्यक्रमात मा अनिल कुंभरे यांनी वर्धापण सप्ताह, बालकाचे अधिकार, रस्ता सुरक्षा , सायबर क्राईम याविषयी विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले, श्री अरुण पिसे बिट जमादार यानी पोलिसाची विविध कार्य आणि जीवन जगताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी उदबोधन केले अध्यक्षीय मार्गदर्शन मा सतीश ठेगरे साहेब,यानी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा मुख्याध्यापक श्री एस डी मेश्राम सर यानी केले सदर कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक श्री श्रीहरी ठेंगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एम बी धोटे सर यांनी केले.सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.