✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागभीड(दि.7 जानेवारी): – नागभीड पोलीस स्टेशन व पोलीस पाटील संघटना नागभीड यांच्या संयुक्त विध्यमाने नागभीड पोलीस स्टेशनच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले होते,यात 53 रक्तदात्यानी रक्तदान करून सहभाग नोंदविला ,
रेजिंग डे पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन नागभिड व पोलीस पाटील संघटना यांचे संयुक्त विध्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नाशिकराव तिरपुडे ब्लड बँक नागपूर, डॉ.तन्वी महाजन, सुशील सोनवने, पि.आर.ओ. नागपूर व चमू उपस्थित होते,या शिबिरात पोलीस अधिकारी राजुभाऊ मेंढे,वैभव कोरवते, उप निरिक्षक साखरे, बारसागडे, सुधाकर माकोडे, कर्मचारी तसेच यावेळी पोलीस पाटील संघटनेचे-अध्यक्ष प्रवीण रामटेके, सुरेशजी पालपणकर उपाध्यक्ष, हर्षल गजभिये सचिव, सारये अशोक खोकले,रजंनी नवघडे बंहुस्खेनी पोलीस पाटील तसेच नागभीड पोलीस कर्मचारी उपस्थित होते ज्यांनी रक्तदान करुण आपले कर्तव्य बजावले त्यांना ब्लड बैंक नागपुर कडून टिफीन डब्बा प्रमानपञ देवून गौरविण्यात आले,असा मोठ्या उत्साहात पोलीस वर्धापण दिवस साजरा करण्यात आले.