Home महाराष्ट्र विश्वदिप महाबोधी विहारात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

विश्वदिप महाबोधी विहारात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

160

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6जानेवारी):-शहरालगतच असलेल्या ग्रिनपार्क श्रीरामपूर येथील विश्वदिप महाबोधी विहारात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता महिला मंडळाच्या रमाताई दिघाडे,तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिताताई इंगोले,शिलादेवी मुनेश्वर,वैद्यताई उपस्थित होत्या.सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध,डाँ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.सुजाता महिला मंडळाच्या भगिनींनी बुद्धवंदना घेतली.

याप्रसंगी योगशिक्षक,भारतीय बौध्द महासभा शहराध्यक्ष ल.पुं.कांबळे, शिलादेवी मुनेश्वर,जयाताई काळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रास्ताविक शिलादेवी मुनेश्वर यांनी केले.तर आभारप्रदर्शन तुकाराम चौरे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजाता महिला मंडळाच्या रत्नमाला शेंडे,सुजाता दवने,मंगला गुढे,सुजाता पाटील, काजळे, आडोळे, बुद्धविहार समितीचे अध्यक्ष साहेबराव गुजर,प्रा.प्रल्हाद दवने,के.के.दिघाडे,चद्रकांत आठवले,डी.एस. कांबळे,नारायण खडसे आदिंनी सहकार्य केले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here