✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)
पुणे(दि.6जानेवारी):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे ३९ आयोजित नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रमाचे उदघाटन वृक्षपूजन व वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत. आगळ्यावेगळ्या पध्दतीने उदघाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले, “नक्षञाचं देणं काव्यमंचने गेली २३ वर्षांपासुन जो कवितेचा यज्ञ पेटवत ठेवला आहे. त्यातुन अनेक दर्जेदार काव्यलेखन करणारे कवी तयार झाले. अनेकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन दिलेले आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. या भावनेने काम अनेकांनी काम करावे. कविंना समाजाने जपले पाहीजे. कवितेने स्पर्श केलेला माणूस हा सदैव चैतन्याचा झरा बनत असतो. आज माझ्या शुभहस्ते कवींचे कॅलेंडर-२०२३ व ह्रदयाचे न बोलणारे ठोके काव्यसंग्रह अतिशय सुंदर दर्जेदार प्रकाशित झाले आहे. संस्थेला भविष्याच्या वाटचालीसोबत माझी सदैव साथ राहील.”
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व कवी दिलीप पाटील अध्यक्ष पदावरुन बोलताना म्हणाले की, “सांस्कृतिक, साहित्यिक भूक समाजाची भागवल्यास समाज संस्कृत बनत जातो. आज समाजातील विकृती कमी करण्यासाठी अशा उपक्रमाने समाजाचे स्वास्थ टिकून ठेवते. आज नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या काव्यसादरीकरणामुळे अनेक सुंदर काव्य सादरीकरण झाले, दर्जेदार कवी व्यासपीठावर निर्माण झाल्याची प्रचीती आली. भविष्यातील संस्थेची वाट अभिमान वाटावी अशीच राहील.”
नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे वतीने जागतिक कीर्तीचे “कवींचे कॅलेंडर-२०२३ प्रकाशन सोहळा व कवी वादळकार लिखित “ह्रदयाचे न बोलणारे ठोके..” नभकाव्यसंग्रह प्रकाशन समारंभ आनंदी वातावरणात नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष दिलीप पाटील (ज्येष्ठ साहित्यिक व पाठ्यपुस्तक कवी, नाशिक) व शुभहस्ते प्रकाशन सोहळा कृष्णकुमार गोयल (चेअरमन-कोहीनूर ग्रुप,पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुप्रसिदध उद्योजक वसंत टाकळे, प्रा.दिलीप गोरे, सुभाष वाल्हेकर, विजय शिंदे इ.मान्यवर उपस्थित होते.
कवींचे कॅलेंडर सहभागी निमंञित नक्षञ यांनी बहारदार नक्षञ काव्यमैफल मध्ये पुढील कवी कवयिञींनी सहभाग घेतला. त्यात
सौ. किरणताई मोरे, सौ.वृषाली टाकळे, सौ. दिव्या भोसले, सौ.प्रीती सोनवणे, डाॅ. अनिता सूर्यवंशी, सौ. अश्विनी चौधरी, सौ. प्रा. शालिनी साहरे, सौ. सुलभा चव्हाण, सौ.उषा वराडे, सौ. कांचन मास्ते प्रा. दिलीप गोरे, यशवंत घोडे, अमोल देशपांडे, पियुष काळे, रामदास घुगंटकर, चंद्रकांत ढसोनवणे, भाऊसाहेब आढाव, श्री रामचंद्र पंडीत, शंकर घोरपडे, आनंता साळुंके ,अशोक सोनवणे, इ.नी आपल्या काव्यरचना सादर करुन बहारदार नक्षञ काव्यमैफलीत रंग भरला.
हा सोहळा पैस रंगमंच, थिएटर वर्कशाॅप कंपनी, चिंचवड, पुणे येथे नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संयोजन कवी वादळकार, पुणे प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे संस्थापक राष्टीय अध्यक्ष नक्षञाचं देणं काव्यमंच यांनी उत्तम केले. या संयोजनात प्रा. दिलीप गोरे, यशवंत घोडे, पियुष काळे, मोहन कुदळे, विनायक विधाटे, साईराजे सोनवणे, अमोल देशपांडे, भाउसाहेब आढाव, सुहास जगताप इ.नी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार यांनी केले. सूञसंचालन सौ. रुपाली भालेराव व आभार प्रदर्शन प्रा.दिलीप गोरे यांनी मानले.विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.