✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 4 जानेवारी):–जय बजरंग क्रिकेट क्लब ,ब्रम्हपुरी तर्फे आमदार चषक पेठवार्ड ब्रम्हपुरी भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जी प सदस्य चंद्रपूर याच्या शुभ हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून प्रा. डाँ. राजेश कांबळे माजी जी प सदस्य चंद्रपूर, प्रमुख अतिथी म्हणून विलास विखार गटनेता तथा बांधकाम सभापती न प ब्रम्हपुरी, सोन उर्फ प्रभाकर नाकतोडे सरपंच ग्रामपंचायत उदापुर तथा अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी ब्रम्हपुरी, महेशभाऊ भर्रे नियोजन सभापती तथा नगरसेवक न. प. ब्रम्हपुरी,बंटी श्रीवास्तव माजी नगरसेवक ,सुधीर पेंदीलवार,विजय बगमारे ,अनंताजी उरकुडे,राजेश माडारकर प्रमोद उपासे,अनिल उपासे, संभाजी ढोगे,लोमेश तोंडरे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार चषक भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धे करीता प्रथम पारितोषिक 1,11,111/- (एक लाख अकरा हजार एकशे एकरा रुपये),मा. विजयभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्र यांचे कडून व दितीय पारितोषिक 77,777/-(सत्यात्तर हजार सातशे सत्यात्तर रुपये)मा. दिवाकर निकुरे MD जय श्री. साई बिल्डर ब्रम्हपुरीयांच्या कडुन तर तृतीय पारितोषिक 55,555/-(पंचावन हजार पाचशे पंचावन रुपये) स्व. चंद्रभान सखारामजी भर्रे यांच्या स्मूती प्रित्यर्थ मा. महेशभाऊ भर्रे नियोजन सभापती तथा नगरसेवक न.प.ब्रम्हपुरी यांच्या कडून देण्यात येणार आहे.
विशेष बक्षीस मॅन ऑफ द सिरीज स्व.सुभाष फुटाणे साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री. अनिल उपासे व लोमेश तोंडरे यांच्याकडून आकर्षक चषक तसेच बेस्ट बेस्टमन स्व. सुरेश कार यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री संभाजी ढोंगे व पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांच्याकडून आकर्षक चषक,व बेस्ट बॉलर स्व. राजू ठेंगरी यांच्या स्मूती प्रीत्यर्थ श्री. मोहित ठेंगरी यांचे कडून आकर्षक चषक व बेस्ट फिल्डर स्व. प्रदीप राऊत यांच्या स्मूती प्रित्यर्थ श्री. संदीप राऊत यांचे कडून आकर्षक चषक व बेस्ट विकेट किपर स्व. देवेंद्र दत्तात्रय करपे यांच्या स्मूती प्रित्यर्थ प्रशांत करपे यांच्या कडूनआकर्षक चषक तसेच बेस्ट कँच स्व. नरेश व स्व. हिरामण पिलारे यांच्या स्मूती प्रितीर्थ श्री. गंगाधर पिलारे यांचे कडून आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
आमदार चषक पेटवाड ब्रह्मपुरी भव्य रात्र कालीन टेनिस बॉल हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी आजच्या युगात मुलांनी व मुलींनी सुध्दा खेळामध्ये सहभागी होऊन आपले जीवन सुंदर व छान करावे.विविध खेळामुळे आरोग्य सुजलाम व सुफलाम होत असतो.असे मत उद्घाटना प्रसंगी बोलत होते. उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप राऊत तर संचालन व आभार भास्कर उरकुडे यांनी केले. भव्य रात्रकालीन टेनिस बॅल हाप पिच क्रिकेट स्पर्धेचे(आमदार चषक पेठ वार्ड)स्पर्धेचे आयोजन नियोजन सभापती तथा नगरसेवक महेशभाऊ भर्रे यांनी केले. त्यामुळे वार्डात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.