Home महाराष्ट्र गंगाखेड येथे सिंकदराबाद व साईनगर एक्सप्रेसला थांबा द्या

गंगाखेड येथे सिंकदराबाद व साईनगर एक्सप्रेसला थांबा द्या

79

🔹आ.डॉ.गुट्टे यांचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना लेखी निवेदन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4जानेवारी);-तालुक्यातील १०५ व पालमच्या ८७ गावातील लोकांना प्रवास करण्यासाठी गंगाखेड हे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे नागरिकांची नेहमी वर्दळ असते. तसेच संत जनाबाईंचे जन्मस्थळ असल्यामुळे शहरात अनेक भाविक-भक्त येत असतात. म्हणून प्रवाशांच्या सोईसाठी साईनगर आणि सिंकदराबाद या दोन्ही एक्सप्रेसला गंगाखेड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा, अशी मागणी गंगाखेड​ विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

शिर्डी हे आध्यात्मिक क्षेत्र आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी प्रवासी ये-जा करतात. तसेच तिथे कॅन्सरचे सुसज्ज असे रूग्णालय आहे. त्यामुळे भक्तांसह रूग्णांनाही शिर्डीला ये-जा करावी लागते. म्हणून गंगाखेड रेल्वे स्टेशनला ‘त्या’ एक्सप्रेसला गाड्यांना थांबा मिळावा, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनापूर्वी या दोन्ही गाड्यांना थांबा होता. मात्र, कोरोना नंतर गाड्या थांबत नाहीत. म्हणून दर्शन व उपचारासाठी जाऊ इच्छिणारे प्रवासी आमच्याशी वारंवार हुज्जत घालतात. त्यामुळे आ.डॉ.गुट्टे यांनी केलेल्या मागणीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया स्टेशन प्रबंधक आमरेशकुमार श्रीवास्तव आणि बुकींग क्लर्क शिवाजी दौंड यांनी दिली.

तर रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवेंना भेटणार – आ.डॉ.गुट्टे*
कोरोनापूर्वी सुरळीत असणाऱ्या ‘त्या’ एक्सप्रेस गाड्यांचा थांबा अचानक बंद केल्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लोक वारंवार थांबा देण्याची मागणी करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून मी आज नांदेडच्या विभागीय प्रबंधकांना लेखी पत्र दिले असून त्यावर ते काय भूमिका घेतात? हे पाहून गरज पडली तर रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांच्याशी भेटून गाड्यांना थांबा मिळविणार असल्याचा निर्धार आ.डॉ.गुट्टे यांनी पत्रकारांशी बोलून दाखविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here