✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.3जानेवारी);-भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसुधारक, पहिल्या महिला शिक्षिका कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने जिल्हा कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉक्टर नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, काँग्रेस नेत्या माजी जि.प. सदस्य कुसुमताई अलाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा सचिव सुनील चटगुलवार, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत पा. राऊत, काँग्रेस नेते भैय्याजी मुद्दमवार, अब्दुल भाई पंजवानी, राकेश रत्नावर, गौरव आलम, सदाशिव कोडापे, बाबुराव गडसुलवार, मिलिंद बारसागडे, रुपेश सलामे, सुदर्शन उंदीरवाडे, सुधीर बांबोडे, अमित चांदेकर, रजत धकाते, तया खान उपस्थित होते.