Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !…

महात्मा फुले हायस्कूल येथे सावित्रीमाई फुले जन्मोत्सव उत्साहात साजरा !…

137

🔹भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका सावित्रीमाई फुले – पी.डी.पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.3जानेवारी):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी सावित्रीमाई फुले जन्मोत्सव निमित्ताने महिला मुक्ती दिन – बालिका दिन व महिला शिक्षण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख व्ही टी माळी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे होत्या. प्रमुख अतिथी मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनचे संचालक बाली बयस, मुख्याध्यापक जे एस पवार, पर्यवेक्षक एम बी मोरे उपस्थित होते. शाळेतील विद्यार्थिनी चेतना जावरे हिने महात्मा फुले तर कोमल भोई हिने सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारली होती. तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सावित्रीमाईंची वेशभूषा साकारली. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून शाळेत निबंध, रांगोळी व वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, कंपासपेटी, शैक्षणिक साहित्य व लेखणी भेट देण्यात आली व पर्यवेक्षक एम बी मोरे, एस व्ही आढावे, व्ही टी माळी यांच्याकडून रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आली.

बालिका दिनाचे औचित्य साधून मुन्नादेवी व मंगलादेवी फाउंडेशनच्या वतीने शाळेतील वर्ग ९ वीची रूपाली कुवर व ८ वीची कोमल भोई या विद्यार्थिनींना शाळेची स्कूल बॅग, पाणी बॉटल, टिफिन बॉक्स, शैक्षणिक साहित्य, कंपास पेटी, कलर बॉक्स, बूट, मोजे इत्यादी साहित्य सिद्धी प्रितमसिंह बयस, प्राप्ती निलेशसिंह बयस व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी सावित्रीमाईंचा जीवनपट उलगडून त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी आर सोनवणे यांनी सावित्रीमाईंच्या कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चला हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आपल्या शाळेचे व परिवाराचे नाव मोठे करा असा अनमोल संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here