Home महाराष्ट्र श्री तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथे शालेय इमारत व स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

श्री तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथे शालेय इमारत व स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन

149

✒️तिवसा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

तिवसा(दि.3जानेवारी)–नूतन वर्षाचे औचित्य साधून गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती द्वारा संचालित तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथील शालेय इमारत व वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. सदर उद्घाटनासाठी तिवसा तालुक्यातील लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार तथा माजी मंत्री ऍड. यशोमतीताई ठाकूर विशेष निमंत्रित होत्या. गणेशदास राठी छात्रालय समिती, अमरावती चे अध्यक्ष सन्माननीय वसंतकुमार मालपाणी उपाध्यक्ष मा. जुगलकिशोर गट्टानी आणि सचिव डॉ. गोविंद लाहोटी, सहसचिव मोहन बाबू कलंत्री तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा गावातील विशेष पदाधिकारी पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने झाली या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले व त्यानंतर रितसर माननीय आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे व वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केल्याची घोषणा केली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

शाळेचे मुख्याध्यापक राजेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाची यशोगाथा सांगितली.उद्घाटक म्हणून बोलताना माननीय आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना सर्वधर्मसमभावाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे औचित्य साधून अमरावतीचे प्रतिष्ठित पॉप्युलर बुक डेपोचे संचालक सन्माननीय नंदकिशोर बजाज यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी अमूल्य अशा ग्रंथांची भेट प्रदान केली. अध्यक्षीय भाषणातून बोलताना संस्थेचे अध्यक्ष मा. वसंतकुमार मालपाणी यांनी विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा उद्देश व भविष्यातील विद्यालयाची वाटचाल आपल्या भाषणातून विशद केली. या कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एम. जी. भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयातील शिक्षक ए. ए.काळबांडे यांनी केले यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व वऱ्हा, घोटा आणि माळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here