✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७
मुंबई(दि.2जानेवारी):-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात चक्क बोगस विद्यापीठाच्या संस्थापकाचा सत्कार केला. त्याच्याशी निवांत चर्चा केली, इतकेच नव्हे त्याच्याकडून या विद्यापीठाच्यावतीने दिल्ली येथील होणाऱ्या बोगस पीएचडी पदव्या वाटपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही स्वीकारले, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.
इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी – International Internship University (IIU) हे संपूर्णतः बोगस विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची जगातील कोणत्याही देशात नोंदणी नाही. पियुष पंडित (Peeyush Pandit ) हा भामटा या बोगस विद्यापीठाचा संस्थापक आहे. या भामट्याने आतापर्यंत शेकडो जणांना बोगस पीएचडी विकल्या आहेत. यातून त्याने कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली आहे. या भामट्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा तोतया सचिव उल्हास मुणगेकर याची साथ आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या ‘एसआयटी’च्या हाती आलेली आहे.
पीयूष पंडित हा देशविदेशातील भारतीय लोकांना आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांना दिल्ली येथे बोलावून मोठ्या हॉटेलमधील कार्यक्रमात बोगस पीएचडी पदव्या विकतो. ही बोगस पीएचडी अधिकृत वाटावी, यासाठी हा भामटा कार्यक्रमाला पोलीस, वकील आणि सरकारी कार्यालयातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावतो व त्यांच्या हस्ते बोगस पीएचडी देतो, असे आढळून आलेले आहे.
दिल्ली येथील पोलीस ऑफिसर किरण सेठी यांना या भामट्याने एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते काही जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या.
पंडित नावाच्या भामट्याने राज्यपाल कोश्यारी यांना चक्क त्याच्या फेक विद्यापीठाचे ब्रोशर व इतर भेटवस्तूही दिलेल्या आहेत, सोबत त्याने आमंत्रण पत्रिकाही दिली. ‘स्प्राऊट्स’च्या वाचकांसाठी हा exclusive फोटो आम्ही प्रकाशित करीत आहोत.
या बोगस आभासी विद्यापीठाच्या बोर्डावर मुंबईतील Panbai International School च्या मुख्याध्यापिका प्रतिभा मिश्रा, भानू प्रताप सिंह, के. एल. गांजू, टी. एन. शिरीष कुमार, संदीप मारवाह, प्रकाश जोशी, संजीव सेहगल, एन. डी. माथूर, श्याम सुंदर पाठक यांचा समावेश आहे.
भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. याशिवाय ते महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. मात्र त्यांच्या कारकिर्दीत शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. याशिवाय भ्रष्टाचारही प्रचंड बोकाळलेला आहे. ‘स्प्राऊट्स’ने या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवले. राज्यपालांशी लेखी पत्रव्यवहार केला, प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यासंबंधीत कागदपत्रांच्या फाईल्सही दिल्या. मात्र राज्यपालांना केवळ सत्कार समारंभाचे कार्यक्रम करण्यातच रस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, तरीही राज्यपाल बेफिकीर आहेत.
राज्यपालांचे सचिव उल्हास मुणगेकर हे नियमबाह्य पद्धतीने बसलेले आहेत. राजभवनात बोगस पीएचडी पदव्या वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. बोगस पीएचडी देणाऱ्या संस्थेनेही राज्यपाल कोश्यारी यांचे हस्ते या सर्वांचा सत्कार केला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत असंख्य बोगस विद्यापीठांना जन्म देणारा मधू क्रिशन याचाही राज्यपालांनी सत्कार केला, त्याच्याबरोबर ब्रेकफास्ट केला.
यातून ही बोगस विद्यापीठे अधिकृत असल्याचा संदेश जाईल याची व्यवस्था केली. या सर्व गैरकृत्यांचा मास्टरमाइंड हा मुणगेकर आहे.
मुणगेकर या भामट्याची कारकीर्द अत्यंत भ्रष्ट आहे. राजभवनातून हा भामटा बोगस पीएचडीचे रॅकेट चालवत आहे. याबाबत ‘स्प्राऊट्स’ने वारंवार तक्रारी करूनही राज्यपाल कोश्यारी व राजभवन प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे, मात्र यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार अधिकाधिक बोकाळत चाललेला आहे व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते