Home महाराष्ट्र कोरेगाव भीमा येथे लाखोंचा भिमसागर ; 30 लाखापेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती

कोरेगाव भीमा येथे लाखोंचा भिमसागर ; 30 लाखापेक्षा जास्त आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती

168

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.2जानेवारी):– कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे मानवंदना देण्यासाठी रविवारी 1 जानेवारीला 205 व्या विजयी शौर्य दिनी महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयायांनी अलोट गर्दी करून या शूरवीर योध्याना अभिवादन केले यावेळी 30 लाखापेक्षा जास्त अनुयायी आल्याचे बोलले जात होते.

1 जानेवारी 1818 ला महाराष्ट्रामधील पुण्याजवळ कोरेगाव भीमा या ठिकाणी व भीमा नदीच्या काठी पेशवे आणि नागवंशी महार जात यांच्यामध्ये आत्मसन्मानासाठी ,हक्कासाठी, ऐतिहासिक न भूतो न भविष्यती अशी घाणघोर लढाई झाली.यामध्ये त्या 500 शूरवीर योध्यानी पेशवा बाजीरावाच्या 28000 सैनिकांचा धुव्वा उडवून एक नवीन इतिहास घडवला.आणि जबरी जुलमी पेशवाईचा अंत केला .अश्या शूर पराक्रमी महार जातीच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी एक क्रांतिस्तंभ उभाराला या शूरवीर योध्याना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येणार याचा अंदाज असल्यामुळे येणाऱ्या अनुयायांचा विचार करता पुणे जिल्हा प्रशासन आणि पुणे जिल्हा पोलिस प्रशासन याच्याकडून विशेष काळजी घेतली होती.

यावेळी एक दिवस आधीच पुणे नगर महामार्ग बंद ठेऊन वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली होती याठिकाणी आणि मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था चागल्या पद्धतीने करण्यात आल्याने वाहतुकीस कोणताही अडथळा होत नसल्याचे दिसून आले.यावेळी पी.एम. टी.करून पार्किंग ठिकाणावरून येणाऱ्या अनुयायांना विजयीस्तंभ या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची सोय करण्यात आल्याने लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही.

यादिवशी कोरेगाव भीमा याठिकाणी अभिवादन करण्यासाठी अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत विजयी स्तंभाच्या दिशेने जात होते तरुण वर्ग कपाळाला निळी पट्टी लावून ढोलताशे वाजवत घोषणा देत वातावरण भिममय करत होते यामध्ये वृद्ध महिला पुरुषाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता यावेळी रस्त्याच्या दुतर्फा काही सामाजिक संघटना आलेल्या लोकांना पाणी,नाश्ता,फुलाव राईस,च हाचे वाटप करत होते यावेळी प्रशासनाकडून भीमा नदीवरील पुलावरील लोखंडी सरक्षक आकर्षक फुलांनी सजविला होता त्याचे वेगळेच आकर्षण पाहायला मिळाले.
यावेळी विजय स्तंभाला पुष्पमालानी सजवीले होते विद्युत रोषणाई केली होती सकाळी साडे आठ वाजता बुद्ध वंदना घेऊन सुरुवात झाली यावेळी समता सैनिक दलाचे सैनिक,भीम आर्मीचे सैनिक या सैनिकांकडून या शुरांना मानवंदना देण्यात आली यावेळी सर्वत्र जयभीम नावाचा एकच जयघोष दिसून आला आंबेडकरी अनुयायांचा उत्साह इतका होता की जणू काय हा शौर्य दिन आज एक इतिहास घडवून गेला.

याठिकाणी रिपबलिकन सेनेच्या वतीने या शूरवीर योद्याना मानवंदना म्हणून भिमगिताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता हा कार्यक्रम लोक आवरजून पाहत होते ऐकत होते.याठिकाणी काही सामजिक संघटनानी येणाऱ्या अनुयायांसाठी अन्नदान व्यवस्था केली होती.बाजूला पुणे बार्टी यांनी बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारेचा पुस्तकाचा स्टॉल लावलेला होता या स्टॉलवर पुस्तके घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती यावेळी पुस्तकाची मोठ्याप्रमानात झाली त्यात संविधान या पुस्तकाची जादा विक्री झाल्याचे पाहायला मिळाले उपस्थित पुस्तक प्रेमिकडून याठिकाणी जादा पुस्तक विक्रीचे टेबल लावण्याची मागणी होत आहे त्यासाठी बार्टीने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करत होते .

विजयी स्तंभाला अभिवादन केल्यानंतर आलेले अनुयायी छत्रपती राजा संभाजी महाराजांचे समाधी स्थळ वडू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी जात होते.*या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेल्या काही आंबेडकरी अनुयायांनी याठिकाणी होत असलेल्या गैरसोयी बद्दल नाराजी व्यक्त केली त्यासाठी या विजयी स्तंभाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणेत यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुढाकार घ्यावा अशी मागणी आंबेकड री अनुयायानी केली.यावेळी विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.बाळासाहेब आंबेडकर,भारतीय बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर,आनंदराज आंबेडकर,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,सामाजिक कार्यकर्त्या सुष्माताई आंधारे,अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते,पदाधिकारी,अनेक पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here