Home महाराष्ट्र कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली जनजागृती…

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली जनजागृती…

112

✒️कल्याण(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कल्याण(दि.31डिसेंबर):-मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय अंतर्गत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्या वतीने ३१ डिसेंबर सरते वर्ष तसेच नवीन वर्षाचा प्रारंभ या अनुषंगाने कल्याण रेल्वे पोलीस ठाणेत विविध कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

यामध्ये ३० डिसेंबर २०२२ वार शुक्रवार रोजी १० ते ११ दरम्यान ‘विशेष घातपात चेकिंग’ राबविण्यात आले. यावेळी PSI गोसावी आणि ०६ पोलीस अंमलदार हजर होते. मोहिमेत काहीएक “आक्षेपार्ह” चीज वस्तू मिळून आली नाही. ११:१५ ते ११:४५ वाजेदरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन वरील CIBS कंपनीचे १ मुकरदम व २४ सफाई कामगार यांची नवीन वर्षाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने मिटिंग घेऊन त्यांना ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. १२ ते १ वाजेपर्यंत कल्याण रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षाबल संयुक्तिक ‘रूटमार्च’ व ‘रॅली’ चे आयोजन करण्यात आले. सदर रूटमार्च मध्ये रेल्वे प्रवाशांना बॅनरच्या व मेगा फोन द्वारे दक्ष व सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी PSI जावळे, PSI गोसावी यांच्यासह १८ पोलीस अंमलदार तसेच RPF कल्याण चे २ अधिकारी ४ कर्मचारी, ८ MSF तसेच २४ सफाई कामगार हजर होते. सायंकाळी ५ वाजता अग्रवाल कॉलेजच्या विद्यार्थांनी रेल्वे स्टेशनवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. ६ वाजता व्हिजिबल पोलिसिंग तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले. हे सर्व कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.

सरत्या वर्षाला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना नागरिकांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. मद्यधुंद अवस्थेत रेल्वे प्रवास, वाहन चालविणे किंवा इतर गोष्टीं करतांना जर आपण काळजी घेतली नाही तर रात्र वैऱ्याची आहे आणि काळ झडप घालायला तयार बसला आहे, हेच कदाचित या जनजागृती मोहिमेतून कल्याण लोहमार्ग पोलिसांना सुचवायचे असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here