✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)
नागभीड(दि.30डिसेंबर): -शेतकऱ्यांचे हित जोपासुन शासनाने हमीभाव देवून फेडरेशन द्वारे शेतकऱ्यांचे धान खरेदी करीत आहे,पंरतू 7/12 ऑनलाईन प्रक्रिया व खरेदी क्रेंद्रावर फोटो काठणे त्यानुसार येणारे नंबर नुसार शेतकऱ्यांचा माल खरेदी ( काटा ) करीत असल्याने व शेतकऱ्याच्या घरी जागा नसल्याने शेतातील निघालेला धान ईच्छा नसतांना खाजगी व्यापाऱ्याला बेभाव आर्थीक तोटा सोसत दयावा लागत असल्याचे चित्र आहे,
नागभीड येथील शेतकरी प्रविन केवळराम येरणे व आई श्रीमती शंकुतला येरणे आपल्या स्वताच्या शेतामधील 115 पोते धान खरेदी विक्री केंद्रावर दिनांक 22/12/2022 ला 2 वाहणांनी भरूण आणले,नियमावर बोट ठेवून तुमच्या ऑनलाइन 7/12 वरील नंबर 1127 आहे,तुमचा नंबर अजुन पंर्यंत आलेला नाही,त्यामुळे काटा संध्या होणार नाही,माल ठेवण्यास जागा नाही तुमचा माल वापस घेवून जावे,तुम्हाला माॅसेज आल्यानंतरच धान घेवून यावे, असे संस्थेच्या आवारात असलेल्या कर्मचारी यांनी सांगितले,माल वापसी नेवून घरी जागा नसल्याने सदर माल खाजगी व्यापाऱ्याला बेभावाने विकावे लागले ,
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे,
शेतकरी प्रविन येरणे यांनी प्रञकार परिषद मध्ये मनाले कि,असे किती तरी माझ्या सारख्या शेतकऱ्यांचे आर्थीक नुकसान होत आहे, प्रत्येक शेतकरी बांधवा कडून खरेदी केंद्रावर 40 किलो वजन ऐवजी सरास 42 किलो भरती घेत आहे, शेतकऱ्याकडून प्रती क्विंटल हमाली 20 रुपये पकडून जादा धान 5 किलो हमीभाव 2040=00 ऐकुन 122 रुपये शेतकऱ्याच्या तो स्वरुपात रेट बोडॅ नसल्याचा आरोप हलादित झालेले शेतकरी प्रविन केवळराम येरणे यांनी केला आहे,हि संस्था लूटारू आहे तरी नागभिड शहरासाठी दुसऱ्या धान खरेदी फे्डेसन सेंटरची मांगणी यावेळी प्रञकार परिषद मधुन चंद्रपुर जिल्हा फेडेसन मार्केटिंग अधिकारी व पुणे यांना केली आहे,