✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.30डिसेंबर):- शहरातील बसस्थानक परिसरात एका ७० वर्षीय वृध्द महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अवघ्या काही तासातच आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. ज्ञानेश्वर लक्ष्मण घूबांर्डे (वय ३१, रा. गेवराई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी ज्ञानेश्वर घूबांर्डे याने गेवराई बसस्थानक परिसरातील एका फळ विक्रेत्या ७० वर्षीय महिलेवर मध्यरात्री अत्याचार केला. दरम्यान, पीडितेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा या वयोवृध्द महिलेच्या परिचयाचा होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गेवराई शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातून अटक केली आहे.
या परिसरातील एका दुकानाच्या सिसिटिव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाला होता. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे यांनी केली आहे.