✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
बीड(दि.28डिसेंबर):-राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून पुसद येथे गरजवंत निराधार लोकांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव होण्याकरिता अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने काल दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री गरजवंतांचा शोध घेत सर्वांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या वेळेस ज्या ठिकाणी बेघर लोक आकाशाच्या मंडपाखाली छत नसलेल्या ठिकाणी पांघरून न घेता झोपलेली आढळतात त्यांना थंडीपासून बचावा करता ब्लॅंकेटचे वाटप करण्याचा मानस अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.
त्या अनुषंगाने काल रात्री नवीन पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाजूला तसेच बस स्थानक परिसर, शनी मंदिर परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर या ठिकाणी रात्रीला निराधारांचा शोध घेऊन झोपलेली व्यक्ती आढळल्यावर त्यांना ब्लॅंकेट पांघरून देण्यात आले. यावेळेस शिवाजी चौकात एक वयोवृद्ध आपले हातपाय पोत्यामधून गुंडाळून घेत एका मेडिकलच्या बाजूला झोपलेला आढळला. सदर वृद्धास ब्लॅंकेट देण्यात आले.
हे ब्लॅंकेट देताना आपण आयुष्यामध्ये आज काहीतरी सत्कृत्य केल्याचा आनंद मनाला झाला, आणि दुसऱ्यांच्या व्यथा वेदनेवर फुंकर घातल्यामुळे मन प्रसन्न होते याचा अनुभव घेता आला.
यावेळेस अखिल भारतीय ग्राहक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कय्युम पठाण, तालुका अध्यक्ष मनीष दशरथकर, उपाध्यक्ष कृष्णाजी राऊत, शहर अध्यक्ष राजेश ढोले, अकीब रिजवी, कैलास श्रावणे,प्रकाश खिल्लारे, प्रकाश खंडागळे, बाबूलाल राठोड, फकीरा गायकवाड, शैलेश सकरगे, शेख साजिद, पुंजाजी बावणे , ज्ञानेश्वर घाटे, हरीश पंडित इत्यादी उपस्थित होते.