▪️रस्ता पाणी वीज,आशा मुलभुत सुविधा देण्यासाठी कटीबध रहा,काम करतांना पक्ष पार्टीचे राजकारण नं करता संपुर्ण लोकसंख्या हा निकष डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे आव्हान सरपंच विष्णु रामभाऊ राठोड यांनी केले
________________________________
✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.28डिसेंबर):-येथे गोरं बंजारा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रा प सदस्य यांचा भव्य नागरी सत्कार सन्मान सोहळा पार पडला ,यावेळी सत्कार मुर्ती सरपंच विष्णु रामभाऊ राठोड यांनी सांगितले की रस्ता पाणी वीज,आशा मुलभुत सुविधा देण्यासाठी कटीबध रहा,काम करतांना पक्ष पार्टीचे राजकारण नं करता संपुर्ण लोकसंख्या हा निकष डोळ्यासमोर ठेऊन काम करावे असे ही सरपंच विष्णू रामभाऊ राठोड यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाला डॉ वकील, ग्रामसेवक, कर्मचारी शिक्षक, पत्रकार, शेतकरी उपस्थित होते
सविस्तर असे की गेवराई येथे बंजारा क्रांती दल, गोरं सेना , बंजारा ब्रिगेड ,राष्ट्रीय बंजारा परिषद, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, समस्त गोरं बंजारा समाजाच्या वतीने दि 27/12/2022 रोजी गेवराई येथे बंजारा समाजातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, ग्रा प सदस्य यांचा, सत्कार सन्मान सोहळा पार पडला, सत्कारमूर्ती सरपंच पारुबाई उद्यानाईक राठोड गौडगाव, बळीराम चव्हाण रानमळा, कुंडलिक चव्हाण कुंभेजळगाव, युवराज अर्जुन जाधव पौळाची वाडी, विष्णू रामभाऊ राठोड जयराम नाईक तांडा, बंडू नाना पवार जातेगाव, सीताबाई शिवाजी राठोड राजप्रिपी, भगवान लिंबाजी राठोड केकत पांगरी, एकनाथ गोपीनाथ राठोड वसंत नगर तांडा, या सह अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार सन्मान सोहळा पार पडला , सत्कारमूर्ती सरपंच विष्णु रामभाऊ राठोड यांनी सांगितले की रस्ता पाणी वीज,आशा मुलभुत सुविधा देण्यासाठी कटीबध रहा,काम करतांना पक्ष पार्टीचे राजकारण नं करता संपुर्ण लोकसंख्या हा निकष डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याचे आव्हाण केले.
तांड्यातील शाळा,अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार, तलावाचे व नदिचे खोलिकरण करुण,बंधारे बांधनार आहे अनेक कामे जयराम नाईक तांडा येथे करणारं आहे सर्वांनी या पद्धतीने काम करावे असे ही सरपंच विष्णू रामभाऊ राठोड यांनी सांगितले यावेळी काशिनाथ मामा पवार, डॉ प्रदीप राठोड, बंडूलाल राठोड , डॉ एकनाथ पवार, डॉ जिवन राठोड, सतिश पवार,श्रावन चव्हाण,बी जे राठोड, विठ्ठल राठोड, सांगळे राजेंद्र, रामेश्वर पवार, कृष्णा आण्णा पवार, योगेश पवार, अनिल चव्हाण,आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल राठोड, लक्ष्मण चव्हाण, यांनी परिश्रम घेतले