✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 28 डिसेंबर):-भारत मातेच्या सेवेत वयाची तब्बल 17 वर्ष इमानदारी आणि निष्ठेने सेवा करीत निवृत्त झालेले जनार्दन भगवान साळवे हे उमरखेड येथील रहिवासी असून महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगा मार्फत टॅक्स असीस्टंट या पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेतील पुर्व परीक्षेत घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
या यशाचे श्रेय त्यांनी, महापुरुषांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली संधी आणि साकेत स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच मार्गदर्शक राजकुमार गायकवाड यांना दिले.
सदर परीक्षेसाठी अत्यंत मेहनत आणि संघर्ष करून सर्व प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत साळवे यांनी प्राप्त केलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निरंतर अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि निर्धारित उद्देश पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने मेहनत केल्यास कुणीही यश प्राप्त करू शकतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.
या यशासाठी त्यांना, राजकुमार गायकवाड सर,मेजर संभाजी पाईकराव, सिद्धार्थ मूनेश्वर सर, मोहिते सर, लक्ष्मीकांत पिंपरखेडे सर, मिलिंद बरडे, विद्वान केवटे,भूषण पठाडे, चव्हाण सर मेजर पंडित,वैभव मिराशे, चंद्रपाल साळवे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.