🔸प्रथम पारितोषिक 1,11,111/- (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये)
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.27 डिसेंबर):- जय बजरंग क्रिकेट क्लब ,ब्रम्हपुरी तर्फे आमदार चषक पेठवार्ड ब्रम्हपुरी भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धा दि.02/01/2023 ते अंतिम सामन्यापर्यत वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज चौक ,रेल्वे फाटक जवळ आरमोरी रोड, पेठ वार्ड ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
आमदार चषक भव्य रात्रकालीन टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धे करीता प्रथम पारितोषिक 1,11,111/- (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये),मा. विजयभाऊ वडेट्टीवार माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा श्रेत्र यांचे कडून व द्वितीय पारितोषिक 77,777/-(सत्यात्तर हजार सातशे सत्यात्तर रुपये)मा. दिवाकर निकुरे MD जय श्री. साई बिल्डर ब्रम्हपुरीयांच्या कडुन तर तृतीय पारितोषिक 55,555/-(पंचावन हजार पाचशे पंचावन रुपये) स्व. चंद्रभान सखारामजी भर्रे यांच्या स्मूती प्रित्यर्थ मा. महेशभाऊ भर्रे नियोजन सभापती तथा नगरसेवक न.प.ब्रम्हपुरी यांच्या कडून देण्यात येणार आहे.
विशेष बक्षीस मॅन ऑफ द सिरीज स्व.सुभाष फुटाणे साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री. अनिल उपासे व लोमेश तोंडरे यांच्याकडून आकर्षक चषक तसेच बेस्ट बेस्टमन स्व. सुरेश कार यांच्या स्मृतिपित्यर्थ श्री संभाजी ढोंगे व पत्रकार गोवर्धन दोनाडकर यांच्याकडून आकर्षक चषक,व बेस्ट बॉलर स्व. राजू ठेंगरी यांच्या स्मूती प्रीत्यर्थ श्री. मोहित ठेंगरी यांचे कडून आकर्षक चषक व बेस्ट फिल्डर स्व. प्रदीप राऊत यांच्या स्मूती प्रित्यर्थ श्री. संदीप राऊत यांचे कडून आकर्षक चषक व बेस्ट विकेट किपर स्व. देवेंद्र दत्तात्रय करपे यांच्या स्मूती प्रित्यर्थ प्रशांत करपे यांच्या कडूनआकर्षक चषक तसेच बेस्ट कँच स्व. नरेश व स्व. हिरामण पिलारे यांच्या स्मूती प्रितीर्थ श्री. गंगाधर पिलारे यांचे कडून आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तरी टेनिस बॉल हाप पिच क्रिकेट स्पर्धे करिता क्रिकेट टीमनी जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन जय बजरंग क्रिकेट क्लब ब्रम्हपुरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
आमदार चषक पेटवाड ब्रह्मपुरी भव्य रात्र कालीन टेनिस बॉल हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवानीताई विजयभाऊ वडेट्टीवार महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसयांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. सहउद्घाटक प्रभाकर (सोनू) नाकतोडे सरपंच ग्रामपंचायत उदापुर तथा अध्यक्ष युवक काँग्रेस तालुका ब्रम्हपुरी, अध्यक्ष म्हणून मा. प्रमोदभाऊ चिमुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, प्रमुखात अतिथी म्हणून प्रा. डॉ. राजेश कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, विलास विखार गटनेता ,बांधकाम सभापती ब्रह्मपुरी, सौ. रिताताई उराडे नगराध्यक्ष नगरपरिषद ब्रह्मपुरी, महेशभाऊ भर्रे नियोजन सभापती तथा नगरसेवक ब्रम्हपुरी, हितेंद्र राऊत, सोनू गेडाम राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ,सामाजिक न्याय विभाग ब्रम्हपुरी, बंटी श्रीवास्तव, अनंताभाऊ उरकुडे, विजय राऊत, पुंडलिक ठेंगरी, व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे.