✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.27डिसेंबर):-वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या जिनिंग व प्रेसिंगच्या मोकळ्या जागेत खुले आम दिवस रात्र मटका सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.मटका लावणाऱ्याच्या रांगाच्या रांगा लागलेल्या असून देखील वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदाराकडुन जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंभर मीटर अंतरावर पडीत जिनिंग प्रेसिंगची जागा आहे.त्या जागेवर ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या आशीर्वादाने खुले आम वरळी मटका सुरू असल्याच्या तक्रारी होत आहे. परिसरात मटका सुरू असल्याची माहिती ठाणेदार व बीट जमादाराला असून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे आरोप देखील स्थानिकच्या नागरिकाकडून होत आहे. वरदळीच्या ठिकाणी दिवसरात्र खुले आम मटका सुरू असल्याने ठाणेदाराने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रहिवाशाकडून जोर धरत आहे.