Home महाराष्ट्र जिल्ह्यातील अभूतपूर्व शरीर सौष्ठव स्पर्धा पुसद येथे संपन्न

जिल्ह्यातील अभूतपूर्व शरीर सौष्ठव स्पर्धा पुसद येथे संपन्न

155

🔸दिमाखदार प्रदशनातून विदर्भातील टॉप टेन सौष्ठवांची निवड

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27डिसेंबर):- अत्याधुनिक व डिजिटल कार्य प्रणालीमुळे देशातील तरुणाई शरीर सौष्ठवावर कमालीचे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांचे संकल्पनेतून सुदृढ व बलशाली तरुणाईच्या जडणघडणीसाठी स्थानिक भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत विदर्भ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन तथा यवतमाळ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भव्य विदर्भ स्तरीय टॉप टेन शरीर सौष्ठव स्पर्धा – 2022 चे आयोजन दि.24 डिसेंबर रोजी स्थानिक पुसद अर्बन को-ऑप बँक लि. मुख्य शाखा, तलाव लेआऊट, समोर पुसद येथे सायंकाळी 5:30 वाजता करण्यात आले होते.

सदर भव्यदिव्य शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये विदर्भातील नामवंत बॉडिबिल्डर सहभागी झाले होते.आ.ऍड इंद्रनील नाईक यांचे अध्यक्षतेत पार पडलेल्या स्पर्धेचे उदघाटन आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ पै.तानाजी जाधव यांनी केले तर प्रमुख अतिथी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक अनुकूल चव्हाण यांचे तर्फे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, युवक मंडळाचे सचिव विजय जाधव, माजी आरोग्य सभापती ऍड.भारत जाधव, समीर गवळी, माजी नगरसेवक उत्तम चापके, भाजयुमोचे शहराध्यक्ष सौरव जयस्वाल, विदर्भ बॉडी बिल्डर अँड फिटनेस सचिव अविनाश लोखंडे,पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, सपोनि प्रेमकुमार केदार,टायगर ग्रुपचे उमेश पोखरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन तथा यवतमाळ बॉडी बिल्डर अँड फिटनेस असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त सदर स्पर्धेत विदर्भातील अनेक नामवंत बॉडी बिल्डर सहभागी झाले होते. ‘न भूतो न भविष्यती’ पार पडलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक हर्षल यावले, अमरावती, द्वितीय उमेश साखरे,अकोला, तृतीय पारितोषिक कमलेश कश्यब चंद्रपूर, चतुर्थ पारितोषिक योगेश शेंडे नागपूर, पाचवे पारितोषिक नागेश भाकरे अकोला,सहावे पारितोषिक विजय भोयर अमरावती, सातवे पारितोषिक भारत बोधडे नागपूर, आठवे पारितोषिक सर्वेश शाहू अमरावती, नववे पारितोषिक शेख सोहेल अकोला, दहावे पारितोषिक प्रणव चिस्तालकर वाशिम यांनी पटकावले. हजारो प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून स्पर्धक बॉडी बिल्डर ही भावूक झाले होते.

अंगावर शहारे निर्माण करणाऱ्या बॉडी बिल्डर स्पर्धेचे पंच म्हणून विशाल नीळकंडराव शिंदे, अपरावती, प्रीतम प्रभाकरराव पाटील, अमरावती, चंद्रशेखर कृष्णराव शिंदे, अकोला., हितेश छगणवाल टांक, अकोला, विवेक पुरुषोल्लम बुरडकर, चंद्रपुर,, नीतीन जयदेवराव गावंडे, वाशिम., डॉ. रोगेश बबकराव देवतळे, वर्धा., विशाल वसंतराव मरडवार, वर्धा यांनी सर्वोउत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या दहा विजयी बिल्डरची अनुक्रमे निवड केली.स्पर्धेचे प्रास्ताविक आयोजक शरद मैंद यांनी तर सूत्रसंचालन चंद्रकांत ठेंगे,प्रा. अजय क्षीरसागर यांनी केले. आभारप्रदर्शन भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष ऍड. भारत जाधव यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजीक उपक्रम समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here