✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.26डिसेंबर):-दि.२५ डिसेंबर २०२२ रविवार रोजी संपूर्ण गोंडीयन आदिवासी विर – विरांगण जयंती सोहळा तसेच आदिवासी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे तथा विद्याभुषण, उच्चशिक्षित, समाज बांधवाचे सत्कार करण्यात आला.
आदिवासी समाजातील संघर्षमय मुलानी गरीब परिस्थितित ज़िद्दीने शिक्षण घेतले व अधिकारी होनेसाठी खूप वर्ष अभ्यास करून परिश्रम घेतले व , महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021 परीक्षा उत्तीर्ण करनारे, रवि गरीबदास किन्नाके ,,(उद्योग निरीक्षक),श्रीकांत चौरे(सहायक अभियंता,pwd) संचित शिंदे ( सहायक अभियंता,pwd) विद्यार्थ्यांनी कठिन परिश्रम घेऊन यश प्राप्त केले, आज यांचे विचार युवानसाठी प्रेरणास्थान बनले, त्यानिमित्ताने गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना भद्रावती व गोंडवाना गोटूल घुग्घुस तर्फे भव्यसत्कार,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आल.
,सन्माननीय करण्यासाठी उपस्थित मान्यवर,देवरावेन भलावी, रमेश मेश्राम,महादेव सिडाम, प्रदीप मडावी, संदीप नैताम, गणेश किन्नाके,दीपक पेंदोर,विकास मेश्राम, शैलेश सलामे, कुणाल टेकाम,संदीप तोडासे, अरविंद कोवे,अर्जुन परचाके,लतिष आत्राम, विठ्ठल कुंमरे व सर्व उपस्थित समाज बांधवांच्या वतीने या संघर्षमय मुलांच्या सत्कार करण्यात आला.