🔸शाळेचा परिसर पाहून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला – डॉ. संजय चाकणे
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.26डिसेंबर):- शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे सन १९८२ चे माजी विद्यार्थी वर्तमान राजभवनाचे सदस्य डॉ.संजयजी चाकणे यांनी आज अचानक शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्वांचा व आपला आनंद द्विगुणीत केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी राजभवनाचे सदस्य डॉ.संजयजी चाकणे यांचा मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी शाल,पुष्पगुच्छ व महामानवांची ओळख हा अनमोल ग्रंथ देऊन स्वागत केले.
यासोबत डॉ.प्रमोदजी पाबरे, महादेव रोकडे सर, डॉ.संजय शिंगाणे सर उपस्थित होते. डॉ.चाकणे सर यांनी आपण बसत असलेल्या वर्गाला भेट दिली. शाळेचा संपूर्ण परिसर पाहिला आनंदाने भारावले शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व संपूर्ण स्टाफ यांच्याशी मनसोक्त गप्पा केल्या व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी आपल्या मनोगतात शाळेला मागच्या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाले. शाळेतील आम्ही करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ.चाकने सरांसोबत शाळेच्या परिसरात फेरफटका मारत सरांच्या जुन्या आठवणींमध्ये सर देखील रमले होते. अचानक राजभवनाचे सदस्य आमच्या शाळेला भेट देतात हे आमच्यासाठी अतिशय आनंददायी व प्रेरणादायी आहे.
आमचे माजी विद्यार्थी – आमचा अभिमान आहेत. त्यांनी असंच आमच्या शाळेवर प्रेम करत रहावे असे प्रतिपादन पवार यांनी केले.याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम बी मोरे, ज्येष्ठ शिक्षिका सौ पी आर सोनवणे, एम के कापडणे, एस व्ही आढावे, सी एम भोळे, एच डी माळी, व्ही टी माळी, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, लिपीक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, अशोक पाटील उपस्थित होते.