✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.26डिसेंबर):- तालुक्यातील बाभुळगाव येथे झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाभुळगाव शिवारात गट नंबर 23/2 मध्ये दिनेश सुरेश पाटील यांची केळी लागवड केलेली आहे. रात्री झालेल्या अवकाळी पावसाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्याचा घास तोंडात येण्यापुर्वी निसर्गाने हिरावून घेतला असुन शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने झालेले नुकसानीचा त्वरित पंचनामा करून मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.