✒️समुद्रपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
समुद्रपूर(दि.२५डिसेंबर):-रोजी समुद्रपुर येथे शासकीय विश्रागृहावर पर्यावरण संवर्धन व विकास समितीची बैठक पार पडली.या बैठकीत वर्धा जिल्हयातील समुद्रपूर येथे 12 फेब्रुवारी 2023 ला विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलन कार्यक्रम घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
विदर्भस्तरीय पर्यावरण संमेलनासाठी उदघाटक म्हणून वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदासजी तडस, सह-उदघाटक म्हणून हिंगणघाट येथिल आमदार समीर कुणावार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री अशोक शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कोठारी तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, अतुल वांदिलें यांना निमंत्रित करण्याचे ठरविण्यात आले.
प्रमुख अतिथी,कार्यक्रमांचे अध्यक्ष कार्यक्रमांचे स्थळ यावर विस्तृत चर्चा होऊन त्यावर कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.पर्यावरण संमेलनात पर्यावरण मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण मित्र व पर्यावरण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तर गुणवंत विध्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून अनुभवी व्यक्तींचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून त्यांना सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
तरी येत्या 25 जानेवारी 2023 पर्यंत निबंध तसेच पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर 83810 98404 वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले.बैठक डी. के. आरीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीत समितीच्या विभागीय महासचिव समीक्षाताई मांडवकर , उपतालुकाध्यक्ष ठावरी ताई, सचिव नमिता पाठक व विनोद सातपुते उपास्थित होतें.