✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि. 26 डिसेंबर) :-संत गाडगे महाराज स्मारक धर्मशाळा, ब्रम्हपुरी येथे संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा नुकताच साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी परिसराची सफाई करण्यात आली, प्रसंगी स्वच्छता राखा तथा आरोग्य जपा असा संदेश देण्यात आला. त्यानंतर वैराग्यमूर्ती, संत गाडगे महाराज यांच्या मुर्तीचे व “दलित मित्र” चरणदास उजेडे महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन नगराध्यक्ष रिताताई उराडे, माजी जि. प.सदस्य प्रा. राजेश कांबळे, विद्यमान नगरसेवक अशोक रामटेके, ब्रम्हपुरी ब्लास्ट चे संपादक नेताजी मेश्राम, सचिन राऊत, नारायणराव बोकडे, श्रीराम करंबे , नामदेवराव ठाकुर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुडे, उत्तम बनकर, प्रेमलाल धोटे,माजी जि. प.सदस्य स्मिताताई पारधी, ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर,श्रीधर नागमोती यांच्या उपस्थीतीत पार पडले. मान्यवराचे स्वागत व प्रास्तावीक शाखेचे संचालक डॉ ललीत उजेडे यांनी केले.
तर नेताजी मेश्राम यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी श्री बोबडे महाराज व भजनी मंडळ यांच्या सौजन्याने सुमधुर भजन तसेच गोपालकाल्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कमलाकर उजेडे यांनी केले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यात सुमारे ३००० लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कमलाकर उजेडे, ज्योत्स्ना उजेडे, विहार मेश्राम, सचिन निशाने, जगदिश बावनकुळे, महेश पिलारे, रविंद्र तुपट, लिलाधर बांगरे, मनोहर कावळे, धनेश राखडे, गुलशन मेश्राम, मंगेश शेंडे यांनी अथक परीश्रम घेतले.