Home महाराष्ट्र शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे गंगाखेड येथे आयोजन.डॉ.आंबेडकरवादी मिशन केंद्राचे...

शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे गंगाखेड येथे आयोजन.डॉ.आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांची प्रमुख उपस्थिती

138

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सर्व समस्यावर प्रभावी उपाय असल्याने शिक्षण चळवळ केंद्रस्थानी मानून शिक्षणाला महत्त्व देत भारतीय संविधानामध्ये अंतर्भाव करत शैक्षणिक दृष्ट्या करत सामाजिक क्रांती केली.त्यामुळेच शिक्षण क्रांतीचे राष्ट्रीय अभियान डॉ.आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांनी 6 डिसेंबर 2022 ला प्रारंभ करत गंगाखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियानावर जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन 25 डिसेंबर रविवार रोजी दुपारी दोन वाजता आयोजन केले.

असल्यामुळे सर्व शिक्षित प्रवर्गातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभियानाचे स्वागतध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमा ला प्रमुख उपस्थिती मध्ये मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कामाजी पवार,मा.अनिलकुमार मोरे,डॉ.गोविंद नांदेडे,मा.व्यंकटराव किडे पाटील,मा.आर.बी.मादळे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

आंबेडकरवादी मिशन केंद्राच्या वतीने संविधान निष्ट प्रशासक निर्मितीची राष्ट्रीय चळवळ चालवताना राष्ट्रनिर्मिती व सामाजिक सेवेसाठी संविधानिक अधिकारी निर्मितीची प्रक्रिया संपूर्ण देशभरात सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशनरी काम हातात घेतलेले आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांचे मार्गदर्शन लाभणार असल्यामुळे शिक्षित सर्व प्रवर्गातील नागरिकांनी जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा अ!वश्य लाभ घ्यावा.शिक्षण क्रांती राष्ट्रीय अभियान यशस्वी करण्यासाठी आनंद जंगले,रामभाऊ सावंत,अनंत उजगरे,करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here