✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.24डिसेंबर):-लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड घुग्घुस कंपनीकडून सीएसआर निधीतून नकोडा, उसगाव, शेनगाव व म्हातारदेवी गावात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच ग्रामपंचायत कार्यालयात वृक्ष देण्यात आले.लाॅयड्स मेटल्स उद्योगाकडून २०२२-२३ अंतर्गत सीएसआर निधीतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रम विविध प्रजातींची रोपे लावण्यात आली.यावेळी प्रमुख हेड मा.श्री.संजयकुमार म्हनाले की, निसर्ग सौंदर्यासाठी अधिकाधिक झाडे लावावीत.प्रत्येक व्यक्तीने एक झाड त्याचे सार जपले पाहिजे.
यावेळी प्रमुख हेड मा.श्री.संजयकुमार, एच.आर उपाध्यक्ष पवन मेश्राम, मानव संसाधन व्यवस्थापक तरुण केशवानी, रतन मेडा, ग्रामपंचायतील कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.