Home चंद्रपूर बेंबाळ ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनल चा झेंडा -“चंदू का चांद मुरझा गया, परिवर्तन...

बेंबाळ ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनल चा झेंडा -“चंदू का चांद मुरझा गया, परिवर्तन के दिपक का ऊजाला हुआ !

121

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24डिसेंबर):- मुल तालुक्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेली ग्रामपंचायत म्हणजे बेंबाळ ग्रामपंचायत…. ह्या गावातून अनेकांनी राजकारणात भरारी घेत जिल्ह्यापर्यंत पोहचले. पण बेंबाळ चा विकास मात्र कधी झालाच नाही. बेंबाळ गावात मागील पंधरा वर्षांपासून भाजपाची सत्ता होती. ह्या एवढ्या मोठ्या गावात आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवरच आहे. अनेक योजनाच्या पैशाची अफरातफरी करून योजना पूर्ण केल्या गेल्या नाहीत. विकासपुरुष ग्रामविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि मुल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांनी ग्रामपंचायत मधील भोंगळ कारभार आणि जल योजनेतील ११ लाख रुपयाची रक्कम चंदूने परस्पर स्वतःच्या बँक खात्यात वळवली होती.

ती सारवासारव करण्यासाठी… चंदू मारगोनवार ने सरपंच पद राखण्यासाठी भरपूर जोर लावला. प्रचारादरम्यान विरोधी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे बॅनर फाडणे, बाहेर गाववरुन गुंड प्रवृत्तीची पोरं बेंबाळ गावामध्ये आणुन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मारहाण करणे. बेंबाळ ग्रामपंचायतच्या निवडणूकीला चंदू मारगोनवार ने विरोधकांना मारहाण केली नाही असं कधी आजवरच्या इतिहासात घडलं नाही. असे कृत्य करणे चंदू साठी नवीन गोष्ट नाही. सरपंच पद राखण्यासाठी त्यांने सर्वोतोपरी प्रयत्न केले. तसेच मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये वाटले. आणि वार्डा वार्डात आठ दिवसापासून मतदारांना जेवण दिले. पण विकासपुरुष ग्रामविकास आघाडीला त्याचा काहीही फायदा झाला नाही. याचे दर्शन निवडणूक निकालानंतर दिसून आलेच.

*परिवर्तन करावं लागेलच….*
आपल्याला आपल्या स्वप्नासाठी…., काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील, तेच तेच करुन काहीच साध्य होणार नाही….! विचार बदलावेच लागतील, रिस्क घ्यावीच लागेल, जे नाही जमणार ते जमवावं लागेल, गावाचा विकास करायचा असेल तर…. मार्ग बदलवावा लागेल, तेव्हाच तुम्ही परिवर्तन करु शकाल…! असं मतदारांना पटवून देण्यात आलं होतं. त्यामुळे मतदारांनी बेंबाळ गावात अखेर परिवर्तन घडवून आणलचं….

ह्या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी भाजपा प्रणित विकासपुरुष ग्रामविकास आघाडीचे मुन्ना कोटगले तर कांग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलचे चांगदेव केमेकार निवडणूक रिंगणात आमनेसामने उभे ठाकले होते. आपल्याला परीने प्रचाराला सुरुवात केली.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मूळ तालुक्यात सर्वात मोठे ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणारे पिंपळ ग्रामपंचायत तीवर जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलेले होते.

या निवडणुकीत भाजपा समर्पित विकासपुरुष ग्रामविकास आघाडी तर काँग्रेस व बौद्ध समाज समर्पित परिवर्तन पॅनल यामध्ये जोरदार टक्कर झाली यामध्ये परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार चांगले काशिनाथ केमिकल यांना १२७९ मध्ये मिळवले तर विकास पुरुष ग्रामविकास आघाडीचे मुलाखतले यांना १०१२ मते मिळाली सरपंच पदासाठी तब्बल २६७ मताची आघाडी परिवर्तन पॅनलने मिळवली. आणि सरपंच पद आपल्या ताब्यात काबीज केले. परिवर्तन पॅनलचे सात सदस्य निवडून आले त्यामध्ये वार्ड क्र. १ मधून आशा रवींद्र शेंडे (३५७), वार्ड क्र. २ मधून अरुणा खजेंद्र गेडाम (२७७), कविता नंदिग्रामवार (२७३), वार्ड क्र. ३ मधून विनोद वाढई तर वार्ड क्र. ४ मधून तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याचे विजयी झाले.

यामध्ये किशोर गणपत पगडपल्लीवार (४१२), देवाजी ध्यानबोईवार (४२१), आशा उमाकांत मडावी(३७२), हे उमेदवार निवडून आले. तर विकास पुरुष ग्रामविकास आघाडीचे वार्ड क्र. १ मधून चंद्रकांत गोहणे (३५६) , प्रतिमा भडके (३३२), वार्ड क्र. २ मधून जनकल्याण आघाडीचे राकेश दहीकर (२२०) तर वार्ड क्र. ३ मधून शिला कंकलवार (३४९) निवडून आले.

परिवर्तन पॅनलने सरपंच पदासह सात सदस्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे श्रेय दिपक पाटील वाढई , प्रशांत उराडे, पवन निलमवार, मारोती गद्देकार, मल्लेश मुद्रीकवार, मदनकुमार उराडे, उमाकांत मडावी, दिवाकर कडस्कर, लवसन वाढई , किशोर नंदीग्रामवार, काशिनाथ भडके, दिपक कोटगले तसेच परिवर्तन पॅनलचे संपूर्ण सक्रिय कार्यकर्ते व सदस्य, तसेच गावकऱ्यांना जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here