Home महाराष्ट्र सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२३ चे उत्साहात प्रकाशन

सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२३ चे उत्साहात प्रकाशन

165

🔸सत्यशोधक समाजाचा प्रेरक इतिहास कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक दिपस्तंभ आहे – डॉ.मिलींद बागुल

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

जळगांव(दि.24डिसेंबर):- सत्यशोधक समाजाने इ.स.सन २०२२ ते २०२३ मध्ये १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक पर्वाच्या औचित्याने ” सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका – २०२३ चे प्रकाशन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंदराव सपकाळे हस्ते सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाअध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल,अथर्व प्रकाशनाचे संचालक युवराज माळी , सत्यशोधक कार्यकर्ते विजय लुल्हे मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि .२३ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव येथे श्रीरत्न कॉलनीत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंदराव सपकाळे होते.

मार्गदर्शन करतांना डॉ.मिलिंद बागुल म्हणाले, ” दिनदर्शिका म्हणजे महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रेरक इतिहास व कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक दिपस्तंभ आहे.” धर्मातील दांभिकतेवर ताशेरे ओढणारे पहिले महापुरुष जोतिराव होते असे बापू पानपाटील म्हणाले. कार्यक्रमात रमेश सोनवणे,गिरीष जाधव सर, संतोष गायकवाड,रविंद्र महाजन सर यांनी मनोगत मांडले.कार्यक्रमास कुमूद प्रकाशनाच्या संचालिका संगिता माळी,दिलीप सपकाळे, कलाशिक्षक सुनिल दाभाडे,सागर गुरव,गिरीष चौगावकर,शरद महाजन, सुनिल माळी ( नाशिराबाद ) उपस्थित होते.

विजय लुल्हे यांनी सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका -२०२३ ची सांगितलेली वैशिष्ट्ये : -मुखपृष्ठावर सार्वजनिक सत्यधर्माची सामूहिक प्रार्थना सत्यशोधक कुणास म्हणावे ? यासाठी ” सार्वजनिक सत्यधर्म ” पुस्तकातील महात्मा फुलेंनी सांगितलेले नियम सत्यशोधक समाजाच्या कार्यातील विविध प्रेरणादायी माहिती उदाहरणार्थ – विविध शिक्षण परिषदा व सभा संमेलने महात्मा फुले व कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची व चालविलेल्या प्रबोधनात्मक वृत्तपत्रांची माहिती विधायक ऐतिहासिक लढे प्रबोधनकार ठाकरे , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह कामगार चळवळीचे जनक सत्यशोधक नारायण लोखंडे, कृष्णराव भालेकर , मुकुंदराव पाटील आणि थोर शास्त्रज्ञ,बिनीच्या कार्यकर्त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या नोंदी याचप्रमाणे शिवराय,फुले , आंबेडकर विचारधारेचे व आपल्या मूळ कृषी संस्कृतीनुसार सण, उत्सव व परंपरेची माहिती असून नेहमी प्रमाणे तिथी, नक्षत्र ही उपयुक्त माहिती समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात मुकूंदराव सपकाळे म्हणाले की, ” सत्यशोधक समाजाची सभ्यता,संस्कार नव्याने रुजविणे काळाची गरज आहे.

” कुऱ्हे पानाचे ( ता.भुसावळ ) येथील सत्यशोधक समाज संघ अधिवेशनाच्या यशस्वितेला त्यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने उजाळा दिला. सत्यशोधक समाज संघाचे २ रे अधिवेशन पानाचे कुऱ्हा आयोजनाप्रसंगी रंगभरण स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे कलात्मक प्रमाणपत्र मोफत डिझाईन करून सहकार्य केल्याबद्दल युवराज माळी यांचे विशेष अभिनंदन स्पर्धा समन्वयक विजय लुल्हे व उपस्थितांनी टाळयांच्या गजरात केले.

दिनदर्शिका आपापल्या तालुका कार्यकर्त्यांकडे उपलब्ध आहेत. मुळ ४० रुपये किमतीची दिनदर्शिका सवलतीत ३० रुपयांना मिळेल.जळगाव व परिसरातील पुरोगामी मंडळींनी दिनदार्शिका घेण्यासाठी विजय लुल्हे ( ९९२३३१५२११ ) व आयु . मुकूंदराव सपकाळे यांच्याशी संपर्क साधावा. दिनदर्शिका सर्व समाजातील आपल्या समविचारी संघटना व मित्र परिवारापर्यंत पोहचवाव्या आणि सप्रेम भेट देऊन सत्यशोधक समाज संघ संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार व सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांचे दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रबोधनाचे श्रम सार्थकी लावून संघटन बळकट करावे असे कळकळीचे आवाहन विजय लुल्हे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाशक युवराज माळी यांनी अमूल्य परीश्रम घेतले. कार्यक्रमाची प्रस्तावना विजय लुल्हे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवराम शिरसाठ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here