✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.24डिसेंबर):-सातारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माण खटाव चे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे ३ वाजता फलटण नजीक मलटन येथील बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी खाली पडून अपघात झाला या अपघातामध्ये आमदार गोरे यांच्यासह गाडीतील दोघेजण किरकोळ आणि दोघेजण गंभीर झाले त्याच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आमदार जयकुमार गोरे आपले काम आटोपून पुण्याहून दहिवडी कडे निघाले असता पुणे पंढरपूर हायवेवर फलटण नाजिक मलट न येथील बाणगंगा नदीवरील पुलावरून गाडी खाली पडल्याने हा अपघात झाल्याचे त्याचे रक्षक पोलीस यांनी सागितले त्यावेळी रक्षकाने स्थानिक लोकांच्या मदतीने आमदार जयकुमार गोरे आणि गाडीतील जखमींना बाहेर काढून प्राथमिक उपचार फलटण येथे केल्यानंतर सर्वाँना पुणे येथील रुबी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले त्यांची प्रकृती सद्या ठीक असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सागितले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची बातमी माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने निघाले मोठ्या संख्येने कार्यकर्ते पुण्याला निघत असताना भाजपा कार्यालयाकडून आणि आमदार कुल याच्याकडून कार्यकर्त्यांना आमदार जयकुमार गोरे याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल पुणे येथे येऊन उगाच गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्याचे कुटंबिय हॉस्पिटल मध्ये असून आपण काळजी करण्याचे कारण नसल्याचे कार्यकर्त्यांना सागितले गेले .आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या गाडीला अपघात झाला त्यांची प्रकृती उत्तमरीत्या सुधारणा होऊन बरी होऊन लवकरात लवकर जनतेच्या सेवेला हजर व्हावे म्हणून कार्य करत्यांच्या वतीने शंभू महादेवाला अभिषेक करून साकडे घालण्यात आले यावेळी मुख्य पुजारी चैतन्य बडवे यांनी अभिषेक केला.