Home महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरच बैठक

शासनाच्या जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लवकरच बैठक

122

🔸बहुजन मंत्र्याचे तांडा सुधार समितीला आश्वासन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24डिसेंबर):-आर्णी तालूक्यातील शिरपूर गावातील शेतकरी मागील ७० वर्षापासून शासनाच्या जमिनीवर वहीती करून आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे, त्या शेतकऱ्यांच्या जीवन मरण्याचा हा प्रश्न शासनाने ती शेती त्या शेतकऱ्यांच्या नावे करून सोडवावा अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने आयोजित मोर्चात करण्यात आली. त्याप्रसंगी तांडा सुधार समितीच्या शिषटमंडळासोबत चर्चा करतांना वरील उद्गार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी काढले. शिंदे सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून जिथे जिथे शेतकरी शासनाच्या जमिनीवर वहीती करीत आहे त्या वहिती करीत असलेल्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याबाबतीत धोरण ठरविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केल्या जाईल असे आश्वासन मा. मंत्री महोदयांनी दिले.

जातनिहाय जनगणना, माळपठार येथील शेतकऱ्यांची सिंचन समस्या, क्रिमिलेयर, पदोन्नती, संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी, वसंतराव नाईक यांच्या नावे नागपुरात सभागृह व गहूली येथील स्मारकाचे सोंद्र्यीकरण, अनुसूचित जमातीचा दर्जा, संत रामराव महाराज यांच्या नावे अभ्यासिका व वाचनालय, महामंडळ कर्ज मर्यादेत वाढ, तांडा सुधार योजनेला निधी, घरकुल निधीत वाढ इत्यादी मागण्यांसाठी अखिल भारतीय तांडा सुधार समितीने दिनांक १८ डिसेंबर पासून माळपठार प्रेरणाभूमी गहूली ते नागपूर अशा दीर्घ पल्याच्या संघर्ष यात्रेचे रूपांतर आज २२ डीसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथून विधानभवनावर धडकले. सदर मोर्चाच्या शिसमंडलाने बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी केले तर पायदळ यात्रेचे नेतृत्व संजय मदन आडे यांनी केले. सदर मोर्चाला पोलीसांनी गणेश टेकडीवर अडविल्याने मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

सभेचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक माजी सरपंच रामराव चव्हाण,तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष प्रा.सरदार राठोड, मोहन जाधव, डॉ विष्णू चव्हाण राजेंद्र महिद्रे, सुनिल पवार राजू रत्ने, संजय आडे, धर्मेंद्र जाधव, अखिल भारतीय बंजारा युवासेनाचे पूर्व प्रदेश अध्यक्ष जिनकर राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड, सरपंच सुनिल चव्हाण उपस्थित होते. प्रा.सरदार राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकतेतून मोर्चाची भुमिका माडली. बंजारा व विमुक्त भटक्यांच्या प्रश्नाविषयी सरकार संवेदनशील असून आपल्या पायदळ यात्रेची सरकारने दखल घेतली आहे. नामा बंजारा यांनी पायदळ यात्रेत तसेच आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकाचे विशेषतः स्त्रियांचे मन:पुर्वक आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here