Home महाराष्ट्र कारंजा येथे आरोग्य विषयावर मार्गदर्शन सेमिनार

कारंजा येथे आरोग्य विषयावर मार्गदर्शन सेमिनार

101

🔹शहरातील विविध सामाजिक संघटनेचे आयोजन.

✒️कारंजा घाडगे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कारंजा(घा)(दि.22डिसेंबर):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरात प्रथमच आरोग्य विषयावर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.हे सेमिनार दिनांक २५/१२/२०२२ रोज रविवारला दुपारी ४ वाजता शहरातील मन्नालाल मातादिन सभागृहात आयोजित केले आहे.मुले कमजोर का असतात, उंची कमी का आहे,वजन का वाढत आहे,मुलगा अभ्यासात मागे का आहे इत्यादी अनेक विषयावर प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.प्रविण खापेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या सेमिनारच्या आयोजनात अरविंद सुरोशे मित्र परिवार कारंजा घाडगे,आशा वर्कर संघटना, नागरी समस्या संघर्ष समिती,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ, संवेदना युवा मंच, त्रिरत्न बौद्ध महासंघ,गुरुदेव सेवा मंडळ, वृक्षमित्र परिवार, प्रहार दिव्यांग संघटना आदी इतर सामाजिक संघटना सहभागी आहे.

आरोग्य मार्गदर्शन सेमिनारच्या प्रमुख अतिथी कारंजा तहसीलच्या तहसिलदार येश्र्वर्या गिरी तर प्रमुख उपस्थिती म्हणून कारंजा शहरातील सर्व पुरूष व महीला डॉक्टर असणार आहे.या सेमिनार मध्ये गर्भवती महीला,नव विवाहित जोडे,महीला ,पुरूष यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सेमिनारचा लाभ घ्यावा असे आवाहन अरविंद सुरोशे भारतीय, गुणवंत मुळे,प्रविण भिसे,उमेश पाचपोहर, राजेंद्र इंगळे, पीयूष रेवतकर,सुदर्शन चरपे, दशरथ डांगोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here