✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.22डिसेंबर):- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे रवी गरीबदास किन्नाके यांचा सत्कार करण्यात आला आहे. भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे सरांचा विद्यार्थी असलेला रवी गरीबदास किन्नाके हा एमपीएससी मध्ये उत्तीर्ण होऊन त्यांची उद्योग निरीक्षक पदी नुकतीच निवड झाली.
त्याअनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रवी किन्नाके यांचा ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाचे अमोल थेरे, श्रीकांत सावे, मानस सिंग, गणेश खुटेमाटे, निरंजन डंभारे, धनराज पारखी, निलेश भोंगळे उपस्थित होते.