✒️धनज(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
धनज(दि.21डिसेंबर):- दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनज या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली सर्वप्रथम इयत्ता चौथीचा विद्यार्थी संस्कार याने संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारली. या वेशभूषा साठी सोनटक्के मॅडम, देवकते सर व कवडे सर यांनी परिश्रम घेतले. त्यानंतर गाडगे महाराज बनलेल्या संस्कारने स्वतःची भूमिका विद्यार्थ्यांसमोर कथन केली.
गाडगे महाराजांविषयी व त्यांच्या जीवनावर सखोल अशी माहिती व मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक कांबळे सर यांनी सांगितले. त्यानंतर गाडगे महाराज बनलेला संस्कार, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनी शाळेचा परिसर स्वतःच्या हाताने स्वच्छ केला. स्वच्छता मोहीम संपल्यानंतर सुधाकर कवडे सर यांनी गाडगे महाराज व त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग विशद केले. सर्व विद्यार्थ्यांना गाडगे महाराजांची हुबेहुब वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्याचे कौतुक वाटत होते.
गाडगे महाराजांनी दिलेली दशसुत्री व त्यांनी सांगितलेले प्रबोधन पर विचार सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून ऐकले. गाडगे महाराजांची दशसूत्री जर आपण अंगीकारली व येथील राज्यकर्त्यांनी ती स्वीकारली तर आदर्श लोकशाही आदर्श राज्य तयार होईल. अंधश्रद्धा मुक्त व अज्ञान मुक्त समाज घडण्यास मदत होईल असे प्रतिपादन कवडे सर यांनी केले देवसरकर सर यांनी सुंदर गीत गाऊन प्रबोधन केले गरकळ सर यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर माहिती सांगितली. पाठक सर यांनी स्वतः मोहीमे मध्ये सहभाग घेतला. स्वतः संतांस पाहून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची उत्सूकता विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले.
अमोल जोगदंडे/ धनज प्रतिनिधी