Home चंद्रपूर राज्यभरातील हजारो संगणक परिचालक 21 डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढणार

राज्यभरातील हजारो संगणक परिचालक 21 डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढणार

102

🔹1948 च्या वेतन कायद्यानुसार वेतन द्या :हजारो संगणक परिचालक विधानभवनावर धडकणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 20 डिसेंबर):- ग्रामीण भागाच्या विकासाला गतिमान करणाऱ्या राज्यभरातील हजारो संगणक परिचालक 21 डिसेंबरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढणार आहेत. ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधामध्ये पदावर सामावून घेऊन किमान वेतन कायदा 1948 नुसार मासिक वेतन मिळावे, ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी आहे.

हिवाळी अधिवेशनावर राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सुमारे 22 हजार संगणक परिचालकांसह 21 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ब्रम्हपुरी तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सभेत दिली आहे. मागणी यांनी सांगितले.

लिपिक काम डाटा एन्ट्री ऑपरेटर या राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत पदावर सामावून घेऊन किमान वेतन समिती, जिल्हा परिषदेचे सर्व प्रकारचे कायदा 1948 नुसार मासिक वेतन मिळावे, ऑनलाईन तसेच ऑफलाइन काम ही संगणक परिचालकांची प्रमुख मागणी संगणक परिचालक करतात. त्या संगणक परिचालकांना सरकारकडून हक्काचे मानधन एक ते दीड वर्ष मिळत नाही. त्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून चालविण्यात येतो.

या प्रकल्पाचे काम करण्यासाठी दिल्ली येथील सीएसपीव्ही या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. संगणक परिचालकांचे मानधन हडप करणे, स्टेशनरी पुरवठा न करणे, प्रशिक्षण न देता सॉफ्टवेअर बोगस देऊन 14 व्या वित्त आयोगातील जनतेच्या विकासासाठीचा कोटयवधी रुपयांचा निधी हडप करण्यात येत असल्याची तक्रार सरकारकडे करूनही सीएससी एसपीव्ही आणि तिच्या उपकंपन्यांना शासनाकडून अभय देण्यात येत आहे. असा प्रश्न राज्यातील संगणक परिचालकांनी उपस्थित केला आहे.

लिपिक काम डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती द्या—

आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प सरकारची आयटी क्षेत्रात काम करणारी सीएससी एसपीव्ही ही नवी दिल्ली स्थित कंपनी ग्रामपंचायती मधील आपले सरकार सेवा केन्द्र प्रकल्पातील संगणक परिचालक याना समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधामध्ये एन्ट्री ऑपरेटर या पदावर सामावून घेऊन किमान वेतन कायदा 1948 नुसार मासिक वेतन मिळावे अशी परिचालकाची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here