🔸सरपंच वगळता हेगडी ग्रामपंचायतचे पॅनल बिनविरोध
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.22डिसेंबर):- तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य निवडीसाठी मतमोजणीची प्रक्रिया दि.२० डिसेंबर २०२२ रोजी तहसील कार्यालयात पार पडली. तालुक्यातील हेगडी ग्रामपंचायतचे सरपंच वगळता सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तर हुडी बु. येथील ग्रामपंचायतीचे सदस्य देखील बिनविरोध निवडून आले आहे.
हुडी खुर्द येथील सदस्य म्हणून लवकुश राठोड, लोडबा पवार,सुनिता जाधव,संजय पवार, मंदा जाधव, अरुणा पवार, पंजाब जाधव, आशा राठोड, पूजा पवार हे बिनविरोध निवडून आले आहे.हेगडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून प्रकाश पवार हे निवडून आले आहे.तर गणेश मंदाडे, सुनीता पुलाते, मांगीलाल राठोड, मंदा राठोड, सविता चव्हाण हे बिनविरोध निवडून आले आहे.हुडी बु. येथे सदस्य म्हणून विशाल कोल्हे,वर्षा कांबळे, अरुणा कांबळे, सारंग बावणे, सुमन हरणे,सुभाष कांबळे, भारत अलोने,सीमा धरणे ह्या मतदानातून निवडून आल्या आहेत.जाम नाईक-एक येथुन सदस्य म्हणून अश्विनी आठवले सीमा मस्के या जनतेतून निवडून आल्या आहे. जामनाईक- दोन येथून शोभा सोनटक्के, दिलीप मोहटे, सारिका कलिंदर,प्रकाश धोत्रे, कौशल्या मोहटे व गोदावरी मिटकरी ह्या सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
इंदिरानगर येथून राजू चव्हाण, मीना आडे, उमीता ढोबळे,कौशल्या दौलतोडे, अंबादास पवार,रुक्मिना तोडकर, प्रिया वानखेडे हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सदस्य म्हणून सयाबाई डोंगरे ह्या बिनविरोध निवडून आल्या आहे. सदस्य पदाकरिता प्रभाकर पानपट्टे, छाया कोठुळे, संजय कोठुळे, वैजयंती किरोळे, परमेश्वर हाळसे,उज्वला रहाटे हे जनतेतून निवडून आले आहे. रामपूर नगर ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून सुभाष आडे, ज्योती चव्हाण,उषा राहाटे,उल्हास जाधव, सीमा राठोड, कविता राठोड हे निवडून आले आहे. तर अनिल चव्हाण हे ईश्वर चिठ्ठीतून निवडून आले आहे.शहरापासून जवळच असलेल्या गायमुख नगर ग्रामपंचायत मध्ये एकूण पाच प्रभागांमधील सदस्य पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभाग क्रमांक एक मधून सुनिता गायकवाड, विनोद चव्हाण, संगीता कांबळे, प्रभाग क्रमांक दोन मधून शेख मुख्तार शेख अब्दुल व वैशाली गाडेकर, प्रभाग क्रमांक तीन मधून शेख मोहम्मद बक्षी अब्दुल लतीफ व शेख जुबेदा बी इब्राहिम, प्रभाग क्रमांक चार मधून सुभाष खिल्लारे, खान मोबीन अहमद माजीद व शोभा सरगर,प्रभाग क्रमांक पाच मधून विनोद कांबळे, अरुणा शेळकर,पूजा घोडेकर हे निवडून आले आहे. काटखेडा ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांमधून सदस्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. प्रभाग क्रमांक एक मधून ललिता राठोड, जालंदर राठोड, शीतल जाधव व अलका राठोड हे निवडून आले आहे. तर प्रभाग क्रमांक दोन मधून आकाश धावस, चिंतामण झोडगे तर प्रभाग क्रमांक तीन मधून शालिनी खिल्लारे व संगीता आडे निवडून आले आहे.
बॉक्स
दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा मार्ग मोकळा
गायमुख नगर येथून सुनिता गायकवाड,इंदिरानगर अंजू राठोड, जाम नाईक-एक शेख हलीमा बी करीम, हेगडी संतोष काष्टे, हुडी बु. महानंदा भालेराव, हुडी खु.अभिजीत पवार, सावरगाव गोरे प्रताप बोडके, जामनाईक- दोन मंगला सोनटक्के, रामपूर नगर अनिल चव्हाण व काटखेडा ललिता राठोड यांच्या हाती सरपंचाची धुरा राहणार आहे.