Home महाराष्ट्र मागण्या पूर्ण न झाल्यास ५०० शिक्षक आत्मदहन करण्याचा इशारा

मागण्या पूर्ण न झाल्यास ५०० शिक्षक आत्मदहन करण्याचा इशारा

134

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
अमरावती(दि.20डिसेंबर):- विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांना महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका महानगरपालिकातील सर्व शिक्षकांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्याबाबतचे निवेदन दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य नपा, मनपा यवतमाळ जिल्हा जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांच्याकडून देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी मागण्या पूर्ण न झाल्यास ५०० शिक्षक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.शासनाकडून शिक्षकांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असल्याने राज्य शासनाने विषय न सोडविल्यास दि.१६ जानेवारी २०२३ रोजी राज्यातील दहा हजार शिक्षक आझाद मैदानावर लाक्षणिक आंदोलन करणार असून पाचशे शिक्षक आत्मदहन करणार आहेत.येत्या विधानसभा हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या या मागण्यांबाबत प्रश्न मांडून सर्व शिक्षकांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली.किरण सरनाईकांनी सुद्धा निश्चितच शिक्षकांच्या मागण्यांना न्याय मिळेल व प्रश्न विधिमंडळात उपस्थित करू अशा प्रकारचे आश्वासन दिले.

यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान देणे,२००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जिल्हा परिषद प्रमाणे नगरपालिका शिक्षकांना ऑनलाईन बदली पोर्टल उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद मध्ये केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये नगरपालिका महानगरपालिका मधील शिक्षकांचा समावेश करणे, जिल्हा परिषद प्रमाणे नगरपालिका महानगरपालिका मधील उच्चशिक्षित नेट सेट,पीएचडी धारक शिक्षकांची माहिती शासनाने संकलित करून उच्चशिक्षित शिक्षकांना याप्रसंगी नगरपरिषद पुसद मधील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये गजानन अंभोरे, मारोती ठेंगल, तानाजी काळे, प्रवीण कांबळे ,शिवाजी होडगीर ,प्रसाद महल्ले ,सुरज गिरी, सय्यद मतीन,सय्यद साजिद तथा महिला शिक्षिका मंजिरी दहीकर, पुष्पा सिहोतीया,मनीषा पडलवार, अर्चना म्हैसकर तथा अन्य शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here