Home महाराष्ट्र ग्रामीण युवा संघटनेच्या विदर्भध्यक्षपदी नरेद्र नवनित इंगळे यांची

ग्रामीण युवा संघटनेच्या विदर्भध्यक्षपदी नरेद्र नवनित इंगळे यांची

86

🔸राष्ट्रिय बहुजन मिञ पुरस्कारानी गौरव
__________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.20डिसेंबर):-ऐतिहासिक प्राचीन विरासत नागलोक चैत्य ५० एकर पुरातत्व इतिहास भुमी इसासणी हिंगणा जिल्हा नागपुर येथे १२ व्या जबरदस्त इतिहास नागलोक परिषदच्या वतीने ग्रामीण युवा संघटनेच्या विदर्भध्यक्षपदी मा.नरेंद्र नवनीत इंगळे यांची निवड करण्यात आली हे सामाजिक क्षेत्रात असलेली उल्लेखनीय कार्याची पावती घेऊन मा.नरेंद्र नवनीत इंगळे यांना “राष्ट्रिय बहुजन मित्र पुरस्कार” सुद्धा बहाल करण्यात आला आहे.

नरेंद्र इंगळे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची,व जनतेशी संवाद साधण्याची व गोरगरीबांना साथ सहकार्य करण्याची तसेच सर्व सामाण्य मानसाना न्याय मिळवुन देण्याची तळमळ व आवड आहे व त्यानी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, आरोग्य,शैक्षनिक,व बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम ग्रामीण युवा संघटनेच्या माध्यमातून केले आहे आपल्या देशावर आलेल्या कोरोणा महाभयंकर रोगसंसगामुळे त्या काळामध्ये सुध्दा नरेंद्र इंगळे यांनी कोणतेही भिती न बाळगता रात्रदिवस रुग्णांची सेवा केली आहे.

त्यामध्ये गोरगरिब जनतेला राशन असो वा काही आर्थिक मदत असो दवाखान्यात सुद्धा मदत करत राहता यामध्ये दर ३ मध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे,रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर इंत्यादी उपक्रम राबवुन आयोजित करत असतात त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होतो.बुद्धिस्ट मॉरीज ब्युरो गेल्या चार वर्षा पासून चालवत आहेत दोनसे पेक्षा जास्त लग्न जुळवाजुळविचे काम देखील केले आहे त्यामुळे नरेंद्र नवनीत इंगळे यांनी हे सर्व काम करत तरुणपिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.नरेंद्र इंगळे चे हे सर्व कार्य पाहून या कामाची व कार्याची पावती मिळाली आहे आणी पुरस्कार देखील देन्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here