Home बीड रुग्णालयातील मेडिकल मधुनच औषध घेणे बंधनकारक नाही..!!

रुग्णालयातील मेडिकल मधुनच औषध घेणे बंधनकारक नाही..!!

119

🔸सामाजीक कार्यकर्ते उमेश इंगळे

✒️बळवंत मनवर(विशेष प्रतीनिधी)
__________________________
बीड(दि.20डिसेंबर):-रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी येथील मेडिकल स्टोअर्स मधूनच औषध खरेदी करणे सक्तीचे नाही. असा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे त्यामुळे याबाबत लवकरच रुग्णाच्या हक्कासाठी काय करता येईल याबाबत महाराष्ट्रातील सेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अशी माहिती सामाजीक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी दिली आहे कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तेथील औषधी दुकानातूनच औषध घेण्याची सक्ती रुग्णालयाकडून केली जाते यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र त्याआधी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती करत अनेकांनी फलक लावणे बंधनकारक समजले नव्हते त्यामुळे बाहेरील एखाद्या औषध विक्रेत्याकडे कमी किमतीतील उपलब्ध असलेले हीच औषधे येथे चढ्या भावात विकत घ्यावी लागत होती त्यावर आता उपाय शोधत रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानातूनच औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला असल्याची माहिती रुग्णसेवक संघटनेचे महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली दरम्यान आता या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा मिळणार असून औषधे आणि औषध आणी सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अन्वये अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए )कडून याबाबतचे आदेश प्रस्तुत करण्यात आले आहेत तरी या निर्णयाबाबत सर्व रुग्णालय आणि नर्सिंग होम यांना असे फलक लावणे आता बंधनकारक होणार आहे.

कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्यांकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात यासाठी रुग्णाला किंवा त्यांचा कुटुंबीयांना अडचण येत असेल तर प्रथम पोलिसांना कॉल करा अन्यथा याबाबतीत आम्हाला संपर्क करून लेखी माहिती द्यावी अशी मागणी उमेश इंगळे यांनी केली आहे रुग्णालयाची संलग्न औषध दुकानातूनच औषधी खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे. याकरिता महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये शासनाच्या आदेशासह पत्र देऊन मागणी केली आहे औषध दुकानातूनच औषधाची खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र शासनाकडे सदर हॉस्पिटल वर कारवाई करण्याकरिता मागणी करेल अशी माहिती उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here