🔸गुणवंत सदावर्ते ला माणुसकीचा विसर
🔹अपघात ग्रस्त बालकांना घटनास्थळी भेटण्याचे औदार्य दाखवले नाही
____________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.19डिसेंबर):-स्थानिक पुसद बस स्टेशन समोरील कारला रोडवर जिनिंग प्रेसिंग समोर १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी सायंकाळी ६:३० वाजताचे सुमारास पायी जाणाऱ्या दोन बालकांना एडवोकेट गुणवंत सदावर्ते यांच्या ताफ्यातील वाहन क्रमांक एम एच ०१ इडी १०० या वाहणाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून धडक दिली. या धडकेमध्ये दोन्ही बालक गंभीर अवस्थेत जखमी झाले. त्यात एकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची गंभीर घटना घडली. यावेळी सदावर्ते यांनी जखमींना पाहून थांबले परंतु कुठल्याही प्रकारची दखल व माणुसकी न दाखविता पुढील प्रवासास निघून गेले.
विशेष बाब म्हणजे त्यांच्यासोबत सुरक्षा पोलीस सुद्धा सोबत होते. सदर घटनेमुळे पाहणाऱ्यांनी सदावर्ते यांच्या बद्दल संताप व्यक्त केला.
गुणवंत सदावर्ते यांनी एसटी कामगारांना न्याय मिळवून दिल्याने देशभर ते प्रसिद्ध झाले व कामगारांची संघटना बांधणीसाठी ते पुसदला आले होते. अशा प्रसिद्ध व्यक्तीने माणुसकी व काळजी दाखवून त्या गंभीर बालकांना विचारपूस करायला पाहिजे होती. सदावर्ते यांच्यासह त्यांच्या सहा सात गाड्याच्या ताफ्यातील इतरांनी सुद्धा गंभीर बालकांना उपचारार्थ नेण्यासाठी साधी माणुसकी ही दाखवली नाही.
या गंभीर जखमींना जमलेल्यांनी येथील डॉक्टर पंकज बासटवार यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. या अपघातात अथर्व लक्ष्मण खैरे वय १४ वर्षे व शिवा हनुमान सोळंके वय १८ वर्षे या दोघांचा अपघात केल्याची तक्रार लक्ष्मण विद्याधर खैरे यांनी दिल्यावरून वाहन चालकाविरुद्ध वसंत नगर पोलिसांनी भादविचे कलम २७९,३३७ अनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.