✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.19डिसेंबर):-ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आला आहे.याबाबत तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आले. यामुळे मतदान तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.
गावात गोंधळ
सदर प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रिया देखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला? याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.