Home महाराष्ट्र सुषमा अंधारे यांना फसवण्याचे षडयंत्र कोणाचे – भूषण सरदार

सुषमा अंधारे यांना फसवण्याचे षडयंत्र कोणाचे – भूषण सरदार

139

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.18डिसेंबर);-: जुने व्हिडिओ व्हायरल करून सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या गटनेत्या सुषमा अंधारे यांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आहे तसेच त्यांनी केलेली टीका ही अंधश्रद्धेवर केली होती जाणीवपूर्वक कोणाच्या भावना दुखवण्यासाठी केले नाही . माफी मागताना त्यांनी सांगितले की कोणत्याही गोष्टीला कारण असते व ते पटले की मी मान्य करते तसे नाही. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत महापुरुषांचे विचार सांगतात त्या महापुरुषांचा,संताचा अपमान करणार नाही याचे त्यांना भान आहे. हा व्हिडिओ जुना आहे तेव्हा का कोणाला दिसले नाही ? का कोणी विरोध केला नाही ? एकाच दिवशी सर्व ठिकाणी विरोध केला जात आहे हे काही राजकीय लोकं जाणीवूर्वक करत आहे.

या अगोदर राज्यपाल कोषारी, छिंदम यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांचाअपमान केला तेव्हा का आपण विरोध केला नाही ? ही लढाई भावनिक होऊन लढायची नाही तर या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी करायची आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी वास्तव समजून घ्यावे व कोणी सांगितले म्हणून ,भडकवले म्हणून वास्तव समजून न घेता पाऊल उचलू नये. भाजप विरोधात त्या नेहमीच बोलत असतात म्हणून भाजप त्यांना टार्गेट करत आहे व त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हो संभाजी भिडे यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ असे वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही विरोध करतो परंतु असे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे चा निषेध व्हायला पाहिजे व त्यांना अटक व्हायला पाहिजे होती. परंतु काही मनुवादी जाणीवपूर्वक सुषमा अंधारे यांना कसे फसवता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here