Home महाराष्ट्र रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या जिल्हा संघटक पदी सुरज यादव

रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या जिल्हा संघटक पदी सुरज यादव

166

✒️खामगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

खामगाव(दि.17डिसेंबर):-येथील जनसेवेत सदैव अग्रेसर असणारे एकनिष्ठा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री सुरज यादव यांनी आता पर्यंत हजारों गरीब गरजू व दिव्यांग रुग्णाला आर्थिक मदत व रक्तदाते औषधी वेळोवेळी एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पोहचविली.

या जनसेवेची दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍडवोकेट निलेश करमुडी व प्रदेश अध्यक्ष हनमंत गोत्राळ यांनी दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा संघटक पदी दिनांक १५ डिसेंबर रोजी नियुक्ती केली.

माझ्या विश्वास ठेवून आपण ही जबाबदारी दिली मी आणि माझे मित्र बंधु रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर राहणार अशी ग्वाही सुरज यादव यांनी दिली. अशी माहिती सागर बेटवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कायद्याला प्रबोधनाची जोड दया!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here