Home चंद्रपूर घुग्घुस नगरपरिषद द्वारा दुकानदारांना दंड ठोकणार

घुग्घुस नगरपरिषद द्वारा दुकानदारांना दंड ठोकणार

108

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.16डिसेंबर):-शहरातील सर्व दुकानदारांना नगरपरिषद सुचनेनुसार आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवून मालाची विक्री करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शहरातील सर्व दुकानदारांनी दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करु नये, असे कळविण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र शासन अधिसूचना २०१८अन्वये दुकानदारांनी सर्व नागरिक,व्यापारी, विक्रेते यांनी थर्माकोल, संवेदनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री,वाहतुक, हाताळणी, साठवणूक, प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास नियमानुसार कार्यवाही करुन दंड आकारण्यात येणार आहे.

रस्त्यावर माल ठेवून विक्री करताना आढळल्यास सदर मालाची जप्तीची कार्यवाही करुन रुपये ५०० दंड आकारण्यात येईल, असे नगरपरिषद घुग्घुस प्रशासनातर्फे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here