✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.16डिसेंबर):-Movement for Peace and Justice for Welfare द्वारा आयोजित राज्यस्तरीय चित्रकला आणि निबंध स्पर्धेत स्थानिक श्री.शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,पुसद.च्या विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या लौकिकात भर टाकली आहे.ही स्पर्धा दिनांक २६नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचा विषय “बंधुत्व” हा होता. चित्रकला स्पर्धेत इयत्ता ५ ते ७ च्या गटातून पाचवी ‘अ’ ची कु.साक्षी संदीप कोंडावार हिने प्रथम क्रमांक पटकावला तर निबंध स्पर्धेत इयत्ता ८ ते १०च्या गटातून आठवी “क” कु.रोशनी सिद्धांत गडधने हिने द्वितीय क्रमांक मिळविला.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय एकनाथ उंचेकर,उपमुख्याध्यापक नामदेव सुब्बाराव मंदाडे,पर्यवेक्षक सौ. सुनीता अरुण ठाकरे आणि सर्व शिक्षक/शिक्षिकांनी कौतुक केले.